अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशाह म्हटले जाते. शहेनशहाचं कुटुंब सध्या त्यांच्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आलं आहे. अमिताभ हे काही काळापासून त्यांच्या कल्की 2898 AD या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याशिवाय अभिषेक व ऐश्वर्या वेगळे होत असल्याच्या बातम्याही सतत समोर येत आहेत. मात्र, या वृत्तात कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. अमिताभ बच्चन आणि त्यांचे नाव खूप खास आहे आणि ते त्यांना अनुकूलदेखील आहे. पण अमिताभ यांचे खरे नाव अमिताभ श्रीवास्तव असे आहे, मग ते अमिताभ बच्चन कसे झाले?, याचा खुलासा अमिताभ यांनी स्वतःच केला होता. (know about amitabh bachchan)
बी-टाऊनमध्ये नावाला खूप महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. अनेक सेलिब्रिटींनी त्यांची नावे बदलली आहेत आणि अनेकांनी त्यांच्या नावाचे स्पेलिंग देखील बदलले आहे. या गोष्टीने त्यांना त्यांच्या कारकिर्दीत खूप फायदा झाला असे त्यांचे मत आहे. बिग बींनी आपले नाव बदलले नसले तरी आपले आडनाव नक्कीच बदलले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच त्यांनी आपले आडनाव बदलले होते.
आडनाव बदलण्यामागची गोष्ट अमिताभ बच्चन यांनी मुलाखतींमध्ये आणि केबीसीदरम्यान सांगितली होती. अमिताभ बच्चन म्हणाले की, त्यांचे आडनाव हे त्यांचे वडील श्री हरिवंशराय बच्चन यांची देणगी आहे, जे स्वतः प्रसिद्ध कवी होते. बिग बी म्हणाले होते की, त्यांच्या वडिलांना जातीच्या बंधनातून मुक्त करायचे होते. कवी असल्यामुळे त्यांना बच्चन हे आडनाव पडले. अमिताभ पहिल्यांदा ॲडमिशनसाठी शाळेत गेले तेव्हा तिथल्या शिक्षिकेने त्यांना तुमचे आडनाव काय असेल असे विचारले. तेव्हा त्यांचे आडनाव बच्चन असेल असे वडिलांनी सांगितले होते.
मात्र, बिग बींच्या आडनावाप्रमाणे त्यांचे नावही वेगळे होते, जे नंतर बदलून अमिताभ बच्चन करण्यात आले. अमिताभ यांचे खरे नाव इंकलाब श्रीवास्तव होते. मात्र अमिताभ यांनी त्यांच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन या नावानेच ओळख कमावली. आणि याच नावाने ती जगभरात लोकप्रिय आहे.