किरण माने यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं कायम मन जिंकलं आहे.त्यांचा तो गावरान अंदाज, त्यांचं लिखाण याविषीयी कायम प्रेक्षकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालीकेतून ते पुन्हा प्रेक्षकांच्या नजरेत आले. त्या नंतर एका खूप मोठ्या वादात ते अडकले आणि हे सगळं सावरत बिग बॉस मराठीच्या सीजन चार मध्ये जाळ आणि धूर संगटच असा त्यांचा अंदाज पाहायला मिळाला. सुरवातीला फेल वाटणारे किरण टॉप स्पर्धकांच्या यादीत होते.(Kiran Mane And Daughter)
पाहा लेकीविषयी काय म्हणाले किरण माने ? (Kiran Mane And Daughter)
ते त्यांच्या सोशल मीडियावरवर ही बरेच सक्रिय असतात. त्यांची मत भावना ते त्यांच्या अंदाजात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात.त्यांची मुलगी इशा हिच्या वाढदिवसानिमित त्यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्या फोटोजना त्यांनी भावनिक असं कॅप्शन दिल आहे. किरण मानेनच ऑइल आणि स्पेअरपार्टसचं दुकान होत, त्यांची मुलगी तेव्हा फार लहान होती. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की, मोठी झाल्यावर माझ्या मुलीला कोणी विचारलं बाबा काय करतात तेव्हा ती काय उत्तर देईल? आणि त्यांच्या अंगावर काटा आला.

तेव्हा पासून ते कामाला लागले.आणि ते म्हणाले अभिनयासारखा बेभरवश्याच क्षेत्र निवडल्यामुळे ओढाताण झाली.पैशाची कायम चणचण. रोजचा खर्च भागवणं मुश्किल व्हायचं.पण कोणी विचारल्यावर लहानगी इशा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ‘माझे बाबा ऍक्टर आहेत’ तेव्हा खूप भारी वाटायचं मला, सगळा ताण निवळून जायचा.(Kiran Mane And Daughter)
हे देखील वाचा : साताऱ्याचा बच्चन लवकरचं मोठया पडद्यावर किरण माने मांजरेकरांच्या चित्रपटात साकारणार भूमिका
आज तिला बघितलं की लोक म्हणतात. ‘ही इशा, ऍक्टर किरण मानेंची मुलगी.’ इशाला ते सवयीचं झालं आहे.पण मी जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो. बाप लेकीचं नातं खूप खास असत. आणि बापाच्या मनात लेकीसाठी जी जागा असते ते कधीच कोणी घेऊ नाही शकत, याची जाणीव किरण मानेंची ही पोस्ट पाहून नक्की होते.