मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे. दोघींनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोघी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच खुशबूने लेक झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. दोघी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियावर दोघी एकमेकींबरोबरचे खास क्षण शेअर करत असतात. तितीक्षा व खुशबू सोशल मीडियावर सक्रीय असण्याबरोबरच युट्यूबवरही तितक्याच सक्रीय असतात. दोघी त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षण युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असतात. अशातच गरोदरपणानंतर खुशबू नुकतीच तितीक्षाच्या घरी गेली होती. (Khushboo Tawde went to her sister home)
गरोदरपणानंतर खुशबू तिच्या दोन्ही मुलं व नवऱ्याबरोबर तितीक्षाच्या घरी गेली होती आणि याचे काही खास क्षण तिने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केले आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातीला ती तिच्या राघव या मुलाच्या शाळेत गेल्याचे काही क्षण दाखवते. त्यानंतर अभिनेत्री आईसह तितीक्षाच्या घरी जाते. घरी येताच तितीक्षाला तिच्या भाचीला म्हणजेच राधीला बघून आनंद होतो. त्यानंतर खुशबू-तितीक्षा एकमेकींना कडकडून भेटतात. तर यावेळी तितीक्षाचा नवरा सिद्धार्थ राधीला सांभाळतानाचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – जपनाम सुरु करा, बाबा निराला आले! ‘आश्रम ३’ प्रेक्षकांच्या भेटीला, काय असेल कथा?
पुढे खुशबूचा नवरा संग्राम साळवीदेखील येतो. घरी येताच तो राघवला मिठी मारतो. त्यानंतर सगळे मिळून पावभाजीवर ताव मारतात आणि एकत्र खास क्षण घालवतात. दुसऱ्या दिवशी संग्राम व सिद्धार्थ राघवबरोबर खेळतात. दुसऱ्या दिवशी खुशबू सर्वांसाठी सॅंडविच बनवते आणि याचे काही खास क्षण तिने या व्हिडीओमधून दाखवली आहेत. एकूणच गरोदरपणाच्या सहा महिन्यांनी बहीणीला भेटल्याचा आनंद खुशबूच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
आणखी वाचा – वाढदिवशी सायली संजीव वडिलांच्या आठवणीत भावुक, फोटो पोस्ट करत म्हणाली, “खूप आठवण येतेय आणि…”
दरम्यान, या दोघी बहीणींचा खास बॉण्ड कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. दोघी झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत होत्या. खुशबू सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. मात्र गरोदरपणासाठी तिने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला. तर तितीक्षाची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिकाही नुकतीच संपली. त्यामुळे दोघी आता एकमेकींबरोबरचे काही खास क्षण एन्जॉय करत आहेत.