मराठी चित्रपटसृष्टीत आपलं मत स्पष्ट मांडणारे आणि रोखठोक बोलण्याऱ्यांमध्ये काही अभिनेत्यांची नाव घेतली जातात त्यात शरद पोंक्षे हे नाव देखील आवर्जून घेतलं जात.चित्रपट, मालिका,नाटक या तिन्ही माध्यमांतून शरद पोंक्षे यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.मराठी मालिकांमध्ये त्यांनी भरपूर काम केले आहे शिवाय शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलचं गाजलं होतं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका शरद पोंक्षे यांनी साकारल्या आहेत.(Sharad Ponkshe on Marathi Directors)
नुकतंच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये अभिनेते शरद पोंक्षे सहभागी झाले होते.त्या वेळेस त्यांना भार्गवीने विचारले, “मी तुमच्याबरोबर काम केले असल्यामुळे मला असं वाटत नाही पण, मनोरंजनसृष्टीत तुमची एक वेगळीच प्रतिमा आहे असं का?” त्यावर शरद पोंक्षे म्हणाले, “माझ्या ज्या भूमिका लोकप्रिय झाल्या, त्या खलनायकाच्या भूमिका होत्या.महत्त्वाची भूमिका म्हणजे नथुराम गोडसे एक अत्यंत कट्टर राष्ट्रभक्त, कडक विचारवंत; ज्यांनी गांधीजींना गोळ्या मारल्या त्यांची भूमिका मी केली. ती २० वर्षं केली म्हणजे एक-दोन वर्ष नाही किंवा १०० वगैरे प्रयोग झाले आणि ते बंद पडलेत, असेही नाही १९९८ ते २०१८ एवढ्या प्रदीर्घ काळात त्या नाटकाचे ११०० प्रयोग केले.त्यात खूप राडे झाले या खलनायकांच्या भूमिकांबरोबर मी त्याच्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारधारा पोहोचवण्याची जी व्याख्यानं देतो त्या सगळ्यांमुळे माझी अशी प्रतिमा तयार झाली आहे”(sharad Ponkshe Me Nathuram Boltoy)
हे देखील वाचा- पायलट झाली शरद पोंक्षेंची लेक, फोटो शेअर करत म्हणाले, “माझं आजारपण, खडतर परिस्थिती अन्…”
पुढे गप्पा मारत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत रोखठोक पणे त्यांचं मत व्यक्त केले ते म्हणाले , “दुसरी गोष्ट माझी सुरुवातीपासून खूप निर्माते, काही दिग्दर्शक, काही प्रॉडक्शन मॅनेजर यांच्याशी खूप राडे घालून भांडणं वगैरे झाली आहेत.खूप तमाशे मी केले आहेत कारण मला खोटं अजिबात सहन होत नाही.खोट बोललेलंही सहन होतं नाही आणि मी अशा इंडस्ट्रीत आहे; जिथे सगळे लोक खोटं बोलतात म्हणजे कुणाचेही खरे चेहरे दिसतच नाहीत.सध्या मुखवटे घातलेली माणसं असतात.त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये; पण कारण नसताना उगाचच खोटं बोलतात त्यामुळे माझी सटकते आणि मी राडे घालतो, भांडतो, असं सगळं होतं.त्यामुळे माझी अशी एक खूप मोठी प्रतिमा तयार झाली आहे. नवनवीन कलाकार तर मला खूपच घाबरतात”(Sharad Ponkshe Thipkyanchi Rangoli)
सध्या सोशल मीडियावर देखील शरद पोंक्षे यांच्यावर टीका केली जात आहे.शरद पोंक्षे हे त्यांच्या रोखठोक बोलण्याने नेहमीच चर्चेत असतात.