सध्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. आज महिना उलटून गेला असला तरी या चित्रपटाची क्रेझ काही कमी झालेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरातून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. सहा बहिणींभोवती फिरणार या चित्रपटाच्या कथानकाच्या साऱ्यांच्या मनावर राज्य केलं. कथानकासोबतच चित्रपटातील कलाकारांचंही भरपूर कौतुक झालेलं पाहायला मिळालं. या चित्रपटात अभिनेत्री सुकन्या मोने, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरलं. तसेच चित्रपटाच्या यशात दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. (Kedar Shinde On Baipan Bhari Deva)
लवकरच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन पन्नास दिवस होणार आहेत, यानिमित्त केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “भारतमाता की जय… ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने आणखी भरारी मारली.. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टी स्वतंत्र झाली. सहा लक्ष्मींच्या पावलाने चित्रपटगृहात गर्दी सुरू झाली आणि ती इतर सिनेमांनाही फायद्याची ठरली!! एक स्त्री घर चालवते तर, सिनेमा नक्कीच चालवू शकते. याची ग्वाही या सिनेमाच्या निमित्ताने दिली गेली. लवकरच ५० वा दिवस साजरा करू. सहकुटुंब सहपरिवार आता गर्दी होते आहे. पुढची वाटचाल सोपी नाही पण अवघडही नाही. कारण तुम्ही सोबत आहात. श्री स्वामी पाठीशी आहेत. आणि श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद टप्प्या टप्यावर मिळतो आहे”.
या पोस्टसोबत त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे, ‘यांत त्यांनी यंदाचा ७६ वा स्वातंत्र्यदिन हा ऐतिहासिक सोहळ्याचं निमित्त ठरलं असून ७६ करोडचा गल्ला चित्रपटाने केला असल्याचं, या फोटोमधून सांगितलं आहे’.
सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने केवळ राज्यातीलच नाही, तर जगभरातील महिला प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होऊन महिनाभराचा काळ लोटला, मात्र या चित्रपटाची क्रेझ आद्यपही कायम आहे. त्याचबरोबर कलाकारांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीसुद्धा ‘बाईपण भारी देवा’चे भरभरून कौतुक केले