आजवर ‘झी मराठी वाहिनी’ने साऱ्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘झी मराठी’ वाहिनेने आजवर आशयघन कथानक असलेल्या मालिका, दर्जेदार कार्यक्रम, तसेच विनोदी छटा असलेले विषय हाताळत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकताच या वाहिनीअंतर्गत आयोजित ‘झी मराठी पुरस्कार २०२३’ संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याचे खास फोटोस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मालिकांनी बाजी मारली. (Kavita Medhekar Special Post)
यांत एक नाव आवर्जून घेतलं जाईल ते म्हणजे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’. सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतेय. मालिकेत अक्षरा व अधिपती यांचं लग्न झाल्यापासून त्यांच्यात खुलणार प्रेम पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरतंय. अशातच या मालिकेने ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळयाला ही बाजी मारलेली पाहायला मिळतेय. अनेक पुरस्कार आपल्या नावावर करत मालिकेच्या कलाकारांनी आनंद व्यक्त केला. यात दोन मुख्य पुरस्कार स्वीकारत मालिकेतील एका अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ म्हणजेच अभिनेत्री कविता मेढेकर यांना या भूमिकेसाठी ‘झी मराठी पुरस्कार सोहळ्या’त सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा हे पुरस्कार मिळाले.
पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो कविता मेढेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करत लिहिलं आहे की, “सर्वोत्कृष्ट खलनायिकेला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा हे दोन्ही पुरस्कार मिळणं ही कीमया फक्त लेखिका मधुगंधा कुलकर्णी हीच करू शकते!!! थॅंक यू मधुगंधा!! मी खरोखर तुझी ऋणी आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद तर झालाच पण ह्या फोटोतून तुमच्या लक्षात आल असेल माझ्या बाजुला ऊभी असलेली शर्मिष्ठ राऊत, आमची निर्माती तिलाही माझ्याइतका किंवा खरतर माझ्यापेक्षाही जास्त आनंद झालाय!”
“आणि तेवढाच आनंद “तुला शिकवीन चांगलाच धडा” टिममधल्या प्रत्येक मेंबरला झाला आहे हे मला माहित आहे. थँक यू टीम!! थॅंक यू चंदु सर, आमचे दिग्दर्शक. I am a Director’s Actor; मी भुवनेश्वरी तुमच्या सहकार्याशिवाय साकारू शकले नसते आणि थँक यू टीम झी ही संधी दिल्याबद्दल ! ! पाहात रहा “तुला शिकवीन चांगलाच धडा.”