प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या मालिकांमध्ये अग्रेसर असलेली मालिका म्हणजे भाग्य दिले तू मला. आईची खंबीर साथ असल्यावर कुटुंब कस चालत हे शिकवणारिउ ही मालिका आज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेची नायिका तन्वी मुंडले म्हणजे कावेरी सून असून मुली सारखी तिच्या सासूसोबाबत वागते असं दाखवणारी ही कथा सासू सुनेच्या नात्याची एक वेगळी गोष्ट निदर्शनास अन्नू देत आहे. तर मालिकेचा नायक अभिनेता राज सांगळे म्हणजे राज हा आईच्या आणि बायकीच्या सुखासाठी झटताना कुठी कमी पडत नसल्याचं दिसत आहे.(Kaveri Gets Angry)
मालिकेच्या आता पर्यंतच्या कथानकात राज कावेरी आणि रत्नमाला यांच्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी सांगळेजण पर्यंत करत असल्याचं दिसतय तर सानिया आणि वैदेही यांच्याकडून गेलेली प्रॉपर्टी कशी परत मिळवायची या साठी रत्नमला राज आणि कावेरी मिळून काही ना खाई खटाटोप करताना मालिकेत दिसत आहेत. भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत की, वैदेही नशेत मोहितेंच्या घरी येते. आणि थेट राजच्या खोलीकडे जाते, राजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार इतक्यात तिथे कावेरी येते. कावेरी वैदेहीला दुसऱ्या खोलीत घेऊन जाते आणि तिचा चांगलंच पाहुणचार करते.

तर एकीकडे राज जवळ रत्नमाला आणि आदित्य बसलेला असतो, तेव्हा रत्नमाला राजबद्दल असलेली काळजी आदित्यला बोलून दाखवतात. माझ्या मुलाला आता सगळं परत मिळवावं लागेल, मात्र एका बाबतीत माझ्या मुलाने नशीब काढलं आहे की, त्याला कावेरी सारखी बायको मिळालीय आणि त्याची तिला साथ आहे. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.(Kaveri Gets Angry)