‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये, अमिताभ बच्चन अनेकदा त्यांच्या कौटुंबिक जीवन व करिअरशी संबंधित अनेक गोष्टी शेअर करताना दिसतो. अनेक वेळा स्पर्धकच अमिताभ यांना त्यांच्या करिअरपासून ते पत्नी जया बच्चनपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न विचारतात. पण नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये स्वतः अमिताभ यांनी पत्नी जयाबद्दल एक रंजक खुलासा केला आहे. अमिताभ यांनी सांगितले की, जया घरातील जेवणाची सर्व जबाबदारी सांभाळते. घरातील निर्णयांमध्ये जयाचं वर्चस्व असतं. विशेषतः आमच्या घराच्या किचनवर जयाचं वर्चस्व आहे. (Amitabh Bachchan On Jaya Bachchan)
अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांना सांगून फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंडला सुरुवात केली. जर त्यांनी पहिल्या १० प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली तर ते त्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलवतील. गेल्या सीझनमध्येही बिग बींनी पाच ते सहा स्पर्धकांना त्यांच्या घरी डिनरसाठी बोलावले होते. घरी जेवण कोण शिजवते असे विचारले असता अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, काय शिजवले जाईल आणि कोण काय खावे याची जबाबदारी जया बच्चन घेतात.
आणखी वाचा – “निक्कीमुळेच माझी दुसरी बाजू समोर आली”, अरबाज पटेलचं वक्तव्य, आकंठ प्रेमात, म्हणाला, “माझ्या भावना…”
अमिताभ म्हणाले की, “५० वर्षे झाली आहेत, त्यामुळे जयाला सर्व माहित आहे आणि कोणाला काय आवडते हे ती अचूक ओळखते. घरात अन्न असेल आणि कोणाला काही आवडत नसेल तरी त्याने ते खावे याची ती विशेष काळजी घेते”. त्याचवेळी आमिर खानही ‘कौन बनेगा करोडपती १६’मध्ये मुलगा जुनैदसह आला होता. हा एपिसोड अमिताभ यांच्या वाढदिवसादिवशी ११ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार आहे. तथापि, निर्मात्यांनी या संवादाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये जुनैद अमिताभ यांना विचारतो की, “जया बच्चनबरोबरच्या लग्नावेळी ते घाबरले होते की नाही?”
हे ऐकून अमिताभ गप्प राहतात आणि जुनैदकडे आश्चर्याने पाहतात. त्यानंतर आमिर त्याचा मुलगा जुनैदला गप्प करतो आणि म्हणतो, “असे प्रश्न विचारु नको भाऊ”. जुनैदच्या या प्रश्नावर अमिताभ विनोदी पद्धतीने परिस्थिती हाताळतात आणि त्याऐवजी जुनैदला विचारतात की, “तू विवाहित आहे की नाही. आणि लग्नासाठी तुझ्या मनात कोणी आहे का?”. हे ऐकून जुनैद लगेच म्हणतो, “सर नंतर बोलू”.