‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ चा महाअंतिम सोहळा पार पडला असून हा शो संपल्यानंतरही सर्वत्र या शोची क्रेझ सुरु असलेली पाहायला मिळाली. या शोमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. ‘बिग बॉस’च्या घरात सुरुवातीला जान्हवीने अनेक चुका करुन त्या सुधारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. जान्हवीने ग्रँड फिनालेवेळी नऊ लाख रुपयांची प्राइज मनी घेत ती घराबाहेर पडली. यावरुन अनेकांनी जान्हवीला बोल लगावले. तर जान्हवीने घेतलेल्या निर्णयाचं तिच्या नवऱ्याने म्हणजेच किरण किल्लेकरने कौतुक केलं. जान्हवीवर होणाऱ्या ट्रोलिंगवर तिच्या नवऱ्याने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. (Jahnavi Killekar Husband)
जान्हवीच्या नवऱ्याने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “माझी स्टोरी बघून खूप लोकांनी मला मॅसेज केले. तुला वेड लागलं आहे का?, तुला ती विजेती वाटते असं तिने काय केलं आहे?. आज मला सांगायचं आहे की, आपण अर्धा दिवस जरी घरी नसलो तरी आपली आई दहा वेळा कॉल करुन विचारते. त्यात ७० दिवस त्यांच्या मुलापासून लांब होत्या ना त्याला बघता येत होतं, ना त्याचा आवाज ऐकायला मिळत होता. त्या यातना मनात ठेवून खेळत होत्या. आणि हे त्यांनी केलं आहे. त्यांना जेलची शिक्षा झाली ते दुःख मनात ठेवून त्यांनी खेळावर लक्ष दिलं आणि टास्क पुर्ण केले हे त्यांनी केलं आहे. आपला मित्र घराबाहेर गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या एकटे पडून ही त्यांनी स्वतःची चूक समजताच हात जोडून माफी मागितली हे त्यांनी केलं आहे”.
पुढे त्याने असंही म्हटलं आहे की, “७० दिवस बिग बॉसच्या घरात रोज जेवणं बनवून कंटाळा येवून सुद्धा अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी जेवणं बनवलं का तर लोकांना चांगलं जेवण मिळावं हे त्यांनी केलं आहे. . लगोरीच्या Task मध्ये सूरजला कसं खेळायचं हे डीपी दादा सांगत होते पण त्यांना कोणीच सांगितलं नाही असं खेळ त्या स्वतः स्वतःच गेम खेळत होत्या हे त्यांनी केलं आहे. डोक्याला लागलेलं असताना ही आपल्या टीमला जिंकवण्यासाठी सूरजला शेवटपर्यंत त्यांनी लढत दिली हे त्यांनी केलं आहे. एवढे स्पर्धक असूनही बिग बॉसना Task Queen हा किताब त्यांना द्यावासा वाटला हे त्यांनी केलं आहे. बिग बॉसच्या शेवटच्या क्षणात ही डोकं चालवून योग्य निर्णय घेऊन त्यांनी नऊ लाखांची रक्कम मिळवली हे त्यांनी केलं आहे. जे लोकं त्यांना बोलतं होते, तेच लोकं ग्रँड फिनालेच्या वेळेस योग्य निर्णय, बरोबर निर्णय अशी कमेंट करत होते हे त्यांनी केलं आहे”.
आणखी वाचा – “निक्कीमुळेच माझी दुसरी बाजू समोर आली”, अरबाज पटेलचं वक्तव्य, आकंठ प्रेमात, म्हणाला, “माझ्या भावना…”
शेवटी किरण असेही म्हणाला की, “स्वतःची चूक आपण लगेच विसरुन जातो पण शो संपल्यानंतर ही बाहेर आल्यानंतर स्वतःची चूक लक्षात ठेवून त्यांनी मीडियासमोर सगळ्यांची माफी मागितली हे त्यांनी केलं आहे. ट्रॉफी जरी त्यांना मिळाली नसली तरी आज आमच्या सगळ्यांची मनं त्यांनी जिंकली आहेत. आज जेवढं कौतुक सूरजच होतं आहे तेवढंच कौतुक त्यांनी शेवटच्या टास्कमध्ये घेतलेल्या निर्णयाचं होत आहे हे त्यांनी केलं आहे. परत विचारु नका तिने काय केलं”.