मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी कौन बनेगा करोडपती १५ मध्ये केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. अमिताभ बच्चन यांचा कठीण काळ सर्वांनाच माहित आहे. अगदी कठीण परिस्थितींचा सामना करून अमिताभ यांनी अभिनयाच्या जोरावर स्वतःच असं विश्व निर्माण केलं आहे. अभिनयक्षेत्राशी काहीही संबंध नसताना त्यांना बरीच मजुरीची काम करावी लागली. (Amitabh Bachchan On cleaned washbasins)
याबाबत बोलताना अमिताभ बच्चन यांनी भांडी घासली तसेच बाथरूमचे बेसिनही साफ केले असल्याचे स्वतः सांगितले. ‘कौन बनेगा करोडपती १५’ मध्ये एका स्पर्धकासह संवाद साधत असताना अमिताभ यांनी सांगितले की, मी कधी घरात काम केलं याचा कोणी विचारही केला नसेल. स्पर्धक हर्ष शाहने अमिताभ यांना असाही प्रश्न केला की, तुम्ही काय काम केलं आहे, त्याने असाही प्रश्न केला की त्यांनी कधी भांडी घासली आहेत का? स्पर्धक म्हणाला, ‘मी वडिलांचा व्यवसाय सांभाळतो. आमच्याकडे असणाऱ्या यंत्राचा वापर करून आम्ही सफाईदार स्क्रब बनवतो. सर, तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’
अमिताभ बच्चन यांनी यावर उत्तर देत असं म्हटलं की, “हो सर. मी कितीतरी वेळा भांडी घासली आहेत. स्वयंपाकघराचं बेसिनही साफ केलं आहे. इतकंच नव्हे तर बाथरूमचं बेसिनही साफ केलं आहे. तुम्हाला असं का वाटतंय की, मी अशी काम केली नाहीत”. स्पर्धकाने केलेल्या प्रश्नाला अमिताभ बच्चन यांनी न जुमानता उत्तर दिलं.
अमिताभ सध्या चित्रीकरणामध्ये प्रचंड व्यग्र आहेत. टाइगर श्रॉफ व क्रिती सेनन यांच्यासह ‘गणपत’ या चित्रपटात ते दिसले होते. यानंतर आता ते दीपिका पादुकोण, कमल हसन, प्रभास यांच्या ‘कल्कि २८९८ ईडी’ चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय रजनीकांतबरोबर ते ‘थलाइवर 170’ या चित्रपटातही झळकणार आहेत.