शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा दिवसांनंतरही करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार नाही, तिसरी बायकोही बेपत्ता अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 17, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunjay kapur funeral delay

सहा दिवसांनंतरही करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार नाही, तिसरी बायकोही बेपत्ता अन्...

करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि व्यावसायिक संजय कपूर यांचे १२ जूनला निधन झाले. इंग्लंडमधील शहरात पोलो खेळ खेळत असताना संजय यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयामध्ये त्यांना लगेचच नेण्यात आलं. मात्र उपचार करण्यापूर्वीच संजय यांचं निधन झालं. अंतिम संस्कारासाठी त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात येणार होतं. मात्र संजय यांचं निधन होऊन सहा दिवस उलटले तरीही अंतिस संस्कार झाले नसल्याचे वृत्त समोर आलं आहे. अजूनही संजय यांचं पार्थिव इंग्लंडमध्येच आहे. सहा दिवसांनंतरही संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर गेल्या आहेत. अशातच संजय मृत्यू प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. (Sunjay kapur funeral delay)

संजय यांच्या निधनानंतर त्यांची तिसरी पत्नीही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पण यामागचं नेमकं कारण? आणि तिसरी पत्नी नक्की कुठे आहे? याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, संजय यांचे अंतिम संस्कार दिल्लीमध्ये होणार आहेत. अमेरिकेमधील नागरिकत्व आणि त्यादरम्यानची प्रक्रिया यामुळे संजय यांचं पार्थिव भारतात आणण्यासाठी उशीर होत आहे.

आणखी वाचा – “मानेवर जखमा, दुखणं सुरुच आणि…”, शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर , पती म्हणाला, “काही पुरळसुद्धा…”

View this post on Instagram

A post shared by Priya Sachdev Kapur (@priyasachdevkapur)

मात्र सहा दिवस उलटून गेले तरी संजय यांचं पार्थिव हाती कसं आलं नाही?, नक्की संजय यांचं पार्थिव इंग्लंडमध्येच आहे का? असे विविध प्रश्न आता समोर आले आहेत. कायदेशीर कारवाईमुळे संजय यांचं पार्थिव अजूनही लंडनमध्ये का रखडलं आहे?, कायदेशीर कारवाईमुळे लंडनमध्येच त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले आहेत का?, भारतात संजय यांचं पार्थिव आणून गपचूप अंतिम संस्कार करण्यात आले का? असे विविध प्रश्न विचारले जात आहेत.

आणखी वाचा – शस्त्रक्रियेनंतर दीपिका कक्करच्या पतीने दाखवले घरातील वातावरण, एका महिन्यापासून सुरु होता कठीण काळ, व्हिडीओ समोर

संजय मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव गायब आहे. अजूनही तिची कोणतीच माहिती समोर आलेली नाही. इतकंच काय तर प्रिया यांचं सोशल मीडिया अकाऊंटही आता प्रायव्हेट करण्यात आलं आहे. अचानक त्यांनी गायब होण्यामागचं कारण काय? याबाबत तपास सुरु आहे. संजय यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक आहे. पत्नी प्रिया सचदेव, मुलगा आजरियस, सावत्र मुलगी सफीरा, आई राणी कपूर असा संजय यांचा परिवार आहे. त्यांच्या दोन्ही बहिणी परदेशात स्थायिक आहेत. आता संजय यांच्यावर कधी अंतिम संस्कार होणार? हे काही दिवसांत स्पष्ट होईल.

Tags: bollywood newsentertainment newsKarishma Kapoor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Sajana Marathi Movie

प्रेमाच्या छायेत दडलेल्या अंधाराचं कटू सत्य 'सजना' चित्रपटातून उलगडणार, ट्रेलरने वाढविली उत्सुकता, नवोदित कलाकारांनी जिंकली मनं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.