Vivek Lagoo Death : ज्येष्ठ मराठी अभिनेते विवेक लागू यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. वृत्तानुसार, १९ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०जून रोजी मुंबईतील ओशिवारा स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. विवेक लागू हे एक आदरणीय थिएटर कलाकार होते, ज्यांनी मराठी सिनेविश्वात भरपूर काम करत आपले नाव कमावले. विवेक लागू यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये अनेक उल्लेखनीय भूमिका बजावल्या. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. तर अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. विवेक यांच्या जाण्याने कलाविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.
विवेक यांच्या निधनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मराठीसह हिंदीमध्येही त्यांनी बरंच काम केले होते. त्यांच्या गाजलेल्या कलाकृतींविषयी बोलायचे झाल्यास, टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), ‘अग्ली’ (2013), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015), ’31 दिवस’ (2018) इ. कलाकृतींचा उल्लेख करावा लागेल. त्यांंच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही गाजल्या होत्या.
आणखी वाचा – संजय कपूरच्या तीन पत्नींमध्ये सर्वात श्रीमंत कोण?, करिश्मा कपूरकडे सर्वात कमी पैसे?, सगळ्यात श्रीमंत…
विवेक लागू यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी अभिनेत्री रीमा लागू यांच्याशी लग्न केले. बँकांमधील नाटकांच्या स्पर्धांदरम्यान रीमा यांच्याशी त्यांची भेट झाली. विवेक तेव्हा २३ वर्षांचे होते तर, नयन म्हणजेच रीमा यांचे वय १८ वर्ष होते. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९७८ साली लग्नगाठ बांधली. जवळपास तीन दशके एकत्र संसार केल्यानंतर काही कारणास्तव त्यांच्या नात्यात कटूता आली आणि त्यांच्यातील मतभेद वाढू लागले. घटस्फोटानंतरही अभिनेत्रीने रीमा लागू हेच नाव लावले होते. रीमा यांचे २०१७ साली निधन झाले, तोपर्यंत घटस्फोट झालेला असतानाही त्यांच्यामध्ये सलोख्याचे नाते होते.





