Sairaj Kendre With His Mom : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. मालिकेतील अप्पी व अर्जुन यांची जोडी तर प्रेक्षकांच्या लाडक्या जोडीपैकी एक आहे. अप्पी व अर्जुन या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. दोघांची हटके लव्हस्टोरी साऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. याचबरोबर या मालिकेतील आणखी एक पात्र विशेष चर्चेत असतं ते म्हणजे बालकलाकार साईराज केंद्रे. साईराज या मालिकेत सिंम्बा हे पात्र साकारत आहे. ‘आमच्या पपांनी गणपती आणला’ या गाण्यामुळे साईराज घराघरांत पोहोचला.
सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. साईराजच्या अनेक व्हिडीओमध्ये त्याचे निरागस हावभाव साऱ्यांच्या पसंतीस पडतात. साईराजच्या सिंम्बा या पात्राला घराघरांत पसंती पाहायला मिळाली. मात्र या मालिकेच्या चित्रीकरणानिमित्त या लहानग्या सिम्बाला आपल्या आईपासून दूर राहावं लागतं. नुकताच दिवाळी निमित्त साईराज त्याच्या घरी म्हणजेच मूळ गावी परतला होता. मात्र, आता चित्रीकरणासाठी पुन्हा त्याला सेटवर यावे लागले.
आपल्या वडिलांबरोबर घरातून निघताना साईराज आपल्या आईला मिठी मारुन रडताना दिसला. घराच्या दारातच दोघेही एकमेकांना मिठी मारुन रडताना दिसले. आई-लेकाचं हे खास बॉण्ड साऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसलं. “दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आईला सोडून राहण्याचा पहिला प्रवास सुरु झाला” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
“आई ती आई असते”, “सिम्बा रडताना चांगला नाही दिसत हसत राहा”, “अरे तुला पाहून आम्हाला पण रडू येतंय”, “साईराज तुला खूप मोठं व्हायचं आहे ना”, “बाळा तुझं काम खूप छान आहे. तू तुझ्या आई-बाबांचा आणि आम्हा सर्वांचा पण लाडका आहेस”, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत दोघांच्या बॉण्डचं कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या छोट्या सिंम्बाचा हा आईबरोबरचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.