प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या समुरास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हल्लेखोराने त्याच्यावर सहा वार केले आहेत. या हल्ल्यामुळे बॉलिवूड विश्व हादरलं असून, गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आता पोलिस कुटुंबियाचे जबाब घेत आहेत. अशातच करीनाने पोलिसांना त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली. यावेळी ती जखमी सैफला सोडून बहीण करिश्माच्या घरी गेली होती. (kareena kapoor revealed why she left the saif ali khan)
याबद्दल करिनाने सांगितले की, ज्या रात्री हल्ला झाला, त्या रात्री करीना १२ व्या मजल्यावर होती. आवाज ऐकून ती लगेच ११ व्या मजल्यावर आली. यानंतर अभिनेत्रीने पाहिले की, हल्लेखोर तिचा धाकटा मुलगा जेहच्या खोलीत उपस्थित होता. सैफने मुलाला आणि कर्मचाऱ्यांना त्याच्यापासून वाचवले. सैफ आणि करिनालाही असे वाटले की, हल्लेखोर त्यांचा धाकटा मुलगा जेहवर हल्ला करणार आहे”. करिनाने असं म्हटलं की, हल्लेखोर आणि सैफमध्ये हल्ला-प्रतिहल्ला झाला. ज्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. मात्र, यादरम्यान जेहला हल्लेखोरापासून वाचवल्यानंतर सैफने करीनासह सर्व मुले आणि महिलांना १२ व्या मजल्यावर पाठवले.
हल्लेखोर चकवा देऊन पळून गेल्यावर सैफने प्रथम करीना आणि जेहला १२ व्या मजल्यावर पाठवले. त्यानंतर सैफ त्याचा ६ वर्षांचा मुलगा तैमूरबरोबर ऑटोने हॉस्पिटलला गेला. सैफ हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर करिश्मा आणि करीना एकत्र हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तसंच हल्लेखोराने घरातून काहीही चोरले नसल्याचेही तिने सांगितले. हल्लेखोराने चोरी केली नसली तरी तो खूप आक्रमक असल्याचेही करीनाने सांगितले. आरोपी चोरीच्या उद्देशाने आला होता का? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या या प्राणघातक हल्लानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सेलिब्रिटींवर सतत होत असलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार? या प्रकणाचा तपास कधीपर्यंत लागणार? आणि यातील नेमका गुन्हेगार कोण? याकडे आता सर्वांचे लाक्ष लागून राहिले आहे.