गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यात अभिनेता सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. सध्या सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. शस्त्रकियेनंतर अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपीचा सुगावा अद्याप न लागल्याने आरोपी संदर्भात काही अधिक माहिती मिळते का? यासाठी करीनाचा जबाब महत्त्वाचा होता. काही वृत्तांनुसार, घरी आलेल्या हल्लेखोराशी करीनाचादेखील सामना झाला होता. त्यामुळे याप्रकरणी करीना पोलिसांना काय माहिती देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अशातच आता करीनाचा जबाब समोर आला आहे. (Kareena Kapoor on Saif Ali Khan attacked)
पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये अभिनेत्री करीना म्हणाली की, “हल्ला झाला तेव्हा सैफने मुले आणि महिलांना १२ व्या मजल्यावर पाठवले होते. सैफने महिला आणि मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. सैफने मध्यस्थी केल्यामुळे हल्लेखोर जहांगीर (सैफ-करिनाचा धाकटा मुलगा) पर्यंत पोहोचू शकला नाही. त्याने सैफवर अनेकदा हल्ला केला, हल्ल्यानंतर मी घाबरले होते म्हणून करिश्मा मला तिच्या घरी घेऊन गेली”. यापुढे हल्लेखोराने घरातून काहीही चोरले नसल्याचे म्हटलं.
आणखी वाचा – “मला तो समलिंगी वाटला होता”, फराह खानचं नवऱ्याबद्दल मोठं भाष्य, म्हणाली, “२० वर्षांत कधीही…”
याबद्दल करीना असं म्हणाली की, “घरात दागिने समोरच ठेवलेले होते. पण हल्लेखोराने दागिन्यांना हातदेखील लावला नाही”. हल्लेखोराने चोरी केली नसली तरी तो खूप आक्रमक असल्याचेही करीनाने सांगितले. आरोपी चोरीच्या उद्देशाने आला होता का? हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. पण त्याने दागिन्यांना हात देखील लावला नाही. त्यामुळे हल्लेखोर चोरीच्या उद्देशाना आला नसावा असं स्पष्ट दिसून येत आहे.
आणखी वाचा – नवरी नटली! सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, कुटुंबियांबरोबर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या या प्राणघातक हल्लानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. सेलिब्रिटींवर सतत होत असलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार? या प्रकणाचा तपास कधीपर्यंत लागणार? आणि यातील नेमका गुन्हेगार कोण? याकडे आता सर्वांचे लाक्ष लागून राहिले आहे.