Ambar Ganpule Haladi : सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळीही लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही कलाकार मंडळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याला हळद लागली असल्याचं समोर आलं आहे. हा अभिनेता म्हणजे रंग माझा वेगळा फेम अंबर गणपुळे. अंबर व शिवानी यांची लगीनघाई सुरु असून ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार असून त्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. बरेच दिवसांपासून अंबर व शिवानी यांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत होती. अखेर आता अभिनेत्याच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.
दोघांच्या लग्नाआधीच्या विधींला सुरुवात झाली आहे. काल शिवानी सोनारच्याही लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे फोटो समोर आले. त्यानंतर आता अंबर गणपुळेला हळद लागली आहे. अंबरच्या मित्रमंडळींनी हळदी समारंभाचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. अंबरने त्याच्या मित्रांची ही स्टोरी रिपोस्ट केली आहे. या हळदी स्पेशल फोटोंमध्ये अंबरने पिवळ्या रंगाचा सदरा, पांढरा पायजमा आणि डोक्यावर टोपी असा लूक केला आहे. कुटुंबातील सदस्य अंबरला हळद लावताना दिसत आहेत. यावेळी अभिनेत्याचा आनंद त्याच्या चेहरावर पाहायला मिळत आहे.

काल १७ जानेवारीला अंबरची होणारी पत्नी शिवानी सोनारचा ‘अष्टवर’ विधी पार पडला. या विधीसाठी शिवानीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. शिवानीचे ‘अष्टवर’ विधीचे फोटो व्हायरल झाले आहेत. शिवानीने लग्नाआधीच्या या विधींचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये शिवानी नववधूच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा – Video : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याने चार दिवसांपूर्वीच वर्सोवामधून चोरलेल्या चपला, CCTV फुटेज समोर
‘रंग माझा वेगळा’, ‘दुर्वा’, ‘लोकमान्य’ या मालिकांमधून अंबर गणपुळेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर ‘राजा राणीची गं जोडी’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वीच ‘रंग माझा वेगळा’च्या संपूर्ण टीमने शिवानी व अंबर यांच्या केळवण साजरे केले होते. आता शिवानी व अंबर यांच्या लग्नसोहळ्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.