‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी सहभाग घेतला होता. यापैकी धनंजय पोवार यांची चांगलीच चर्चा रंगली. धनंजय पवार यांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. धनंजय हे आपल्या आई व बायकोबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. सोशल मीडियावर ते आपले अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. स्वत:बरोबरच ते त्यांच्या कुटुंबीय व मित्र-मंडळींबरोबरचेही मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच धनंजय यांची सोशल मीडियावरील एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Dhananjay Powar and Janhvi Killekar funny commented)
धनंजय यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ आहे छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेचा. बिग बॉसच्या घरात छोटा पुढारी व व डीपी दादा यांच्यात चांगलाच बॉण्ड तयार झाला होता. बिग बॉसच्या घरात धनंजय यांनी अनेकदा छोटा पुढारीची मस्करी केली होती. अशातच डीपी दादांनी छोटा पुढारीचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत त्याची मस्करी केली आहे. या व्हिडीओमध्ये छोटा पुढारी बाहुबली मधील एका गाण्यावर सादरीकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss 18 चा ग्रँड फिनाले कधी होणार?, विजेत्याला मिळणार तब्बल इतकी रक्कम, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
छोटा पुढारी या व्हिडीओमध्ये फक्त हावभाव करत असल्यामुळे डीपी दादांनी त्याची चांगलीच टेर खेचली आहे. धनंजय पोवार यांनी छोटा पुढारीचा फक्त हावभाव करतानाचा हा व्हिडीओ शेअर करत मस्करीत असं म्हटलं आहे की, “पुढारी क्लास लावायचा आहे. डबिंगचे व्हिडीओ बनवण्यासाठी तुम्ही कुठे क्लासेस लावले होते का?”. तर जान्हवी किल्लेकरनेही या व्हिडीओवर मिश्किल कमेंट करत असं म्हटलं आहे की, “कॅमेरामनला त्याच्या संयमासाठी सलाम”.
दरम्यान, छोटा पुढारीने त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तर आता जान्हवी व डीपी दादा यांच्या या प्रतिक्रियेवर काय उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.