Kareena Kapoor On Intimate Scene : बॉलिवूडमधील कलाकार जोड्यांची नेहमीच चर्चा सुरु असते. लोकप्रिय कलाकार जोडींमध्ये अभिनेत्री करीना कपूर व अभिनेता सैफ अली खान यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आदर्श जोडी तसेच आदर्श पालक म्हणून या जोडीकडे पाहिलं जात. करीना व सैफ यांनी आजवर त्यांच्या कामाच्या वेळेबरोबरच त्यांच्या मुलांनाही वेळ दिला आहे. बरेचदा ते त्यांच्या मुलांसह क्वालिटी टाइम शेअर करताना दिसतात.
करीना कपूर सैफ अली खान जवळपास पाच वर्षे लिवइनमध्ये राहत होते. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करीनाने याआधीच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितले होते की, दोघेही लिवइनमध्ये आनंदी होते. पण मुलांचा विचार केल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करीना कपूरची मोठी बहीण करिश्मा कपूर हिने सैफ अली खानसह काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच करीनाने ही सैफ अली खानसह अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.
करीना व सैफ अली खान यांच्या ‘कुर्बान’ या चित्रपटाची विशेष चर्चा रंगली. या चित्रपटात दोघांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष भावल्या. ‘कुर्बान’ चित्रपटातील सेक्स सीन विशेष गाजला होता. या सीनबाबत आता करीनाने केलेलं वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. करीना कपूर नुकतीच ‘नेटफ्लिक्स’च्या राउंडटेबल मुलाखतीसाठी पोहोचली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीमुळे करीना पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे.
यावेळी सिद्धार्थ मल्होत्राने करीनाला ‘कुर्बान’ चित्रपटात सैफ अली खानबरोबर शूट केलेल्या सेक्स सीनविषयी विचारले. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराने साऱ्यांना धक्का बसला. करीना म्हणाली, “त्यावेळी आम्ही आधीपासूनच एकमेकांना डेट करत होतो. आम्ही ऑडिशनदेखील दिले होते आणि ते योग्यही होते. त्यामुळे कोणतीही अडचण नव्हती” असे करीना म्हणाली. त्यावर काजोल मजेशीर अंदाजात म्हणते की “ते त्यांचे खासगी ऑडिशन होते” ते ऐकून सर्वांना हसू अनावर होते. यावेळी करीनाला ही हसू आवरत नाही.