बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करीना कपूरचं ‘जाने जान’ चित्रपटामधून ओटीटीवर पदार्पण, टीझरची जोरदार चर्चा, कुठे आणि कधी पाहता येणार?

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 26, 2023 | 1:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kareena Kapoor Khan OTT Debut

करीना कपूरचं 'जाने जान' चित्रपटामधून ओटीटीवर पदार्पण, टीझरची जोरदार चर्चा, कुठे आणि कधी पाहता येणार?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. पण मोठ्या पडद्यावर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर. होय, अभिनेत्री करीना कपूर लवकरच एका नव्या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करीनाच्या वाढदिवशी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. (Kareena Kapoor Khan new Movie)

अभिनेत्री करीना कपूर खानला बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखली जाते. आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ती दिसली असून सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मोठा पडदा गाजवल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवण्यासाठी करीना आता सज्ज झाली आहे. ‘जाने जान’ या चित्रपटाच्या माध्यातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचा टीझर नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे.

हे देखील वाचा – “सर्व सीमा ओलांडून…”, ‘ताली’मध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारल्यानंतर सुव्रत जोशीची पोस्ट, म्हणाला, “आयुष्य किती कठोर…”

करीनाचा ‘जाने जा’ एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटात तिच्यासह अभिनेता विजय वर्मा व जयदीप अहलावत दिसत आहे. जपानी लेखक केइगो हिगाशिनो यांची प्रसिद्ध कादंबरी ‘डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’वर हा चित्रपट आधारित आहे. करीना यात एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार असून यामध्ये काय पाहायला मिळणार आहे, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे. करीनाच्या वाढदिवशी म्हणजे २१ सप्टेंबर रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा – ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’ गाण्याचे गीतकार काळाच्या पडद्याआड, ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात दिसली होती. जो बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. या चित्रपटाव्यतिरिक्त करीनाकडे आणखी दोन चित्रपट आहे. (Kareena Kapoor Khan OTT Debut)

Tags: Kareena Kapoor KhanKareena Kapoor Khan new movieKareena Kapoor Khan OTT Debutnetflixnew web movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Prasad Khandekar and Shlok Khandekar

"बाबा बेबीसीटिंगला असतो तेव्हा…", लेकाला असं सांभाळतो प्रसाद खांडेकर, म्हणाला, "नाश्तासुद्धा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.