Karan Veer Mehra Response To Haters : टीव्ही अभिनेता करण वीर मेहराने रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ च्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर विवियन डिसेना याने उपविजेतेपद जिंकले आहे. करण वीर ‘बिग बॉस १८’चा विजेता झाला आहे हे अनेकांना पटलेलं नाही. करणच्या विजेता झाल्यानंतर अनेकांनी नाराजी दर्शविलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर तर अनेकांनी विवियन विजेता व्हायला हवा होता असं म्हटलं आहे. थेट सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी करणला नापसंती दर्शविली आहे. यावर आता करणने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. BB 18 चा विजेता बनल्यानंतर करण पहिल्यांदा पापाराझींसमोर आला आणि त्यांच्याशी बोलला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
करण वीर मेहरा काही महिन्यांपूर्वी ‘खतरों के खिलाडी १४’ चा विजेता ठरला होता. आणि आता तो ‘बिग बॉस १८’ चा विजेता आहे. साहजिकच, त्याच्या चाहत्यांना अभिमानाने भरुन आले आहे, पण द्वेष करणाऱ्यांना ते पचवता आलेले नाही. कोणी म्हणत आहे की विवियन डिसेना या विजयासाठी पात्र होता तर कोणी म्हणत आहे की रजत दलाल विजेता व्हायला हवे होते.
आणखी वाचा – “तू तुझं बघ”, चाहत्याने OTP मागताच शाहरुख खानने त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, संभाषणात मुंबई पोलिसांचाही सहभाग
अशातच आता करण वीर मेहराने तिरस्कार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो विजेता कधी झाला, तेव्हा शोच्या अनेक माजी स्पर्धकांना आनंद झाला नाही. यावर करण म्हणाला, “जे जळत आहेत ते जळत राहतील”. करणने असेही सांगितले की, जर त्याला ‘लाफ्टर शेफ्स 2’ मध्ये आमंत्रित केले गेले तर तो नक्कीच जाईल, हा शो कलर्स वाहिनीवर २५ जानेवारी २०२५ पासून सुरु होत आहे.
यात एल्विश यादव देखील दिसणार आहे, ज्याने बीबी १८ मध्ये त्याचा मित्र रजत दलाल जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण रजत दलाल हा दुसरा उपविजेता ठरला. विवियन फर्स्ट रनर अप तर करण विजेता ठरला. अविनाश मिश्रा, ईशा सिंग आणि चुम दरंग हे टॉप सहामध्ये होते.