Priyanka Chopra Seeks Blessings : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून ती हैदराबादमध्ये आहे. निक जोनास बरोबर लग्न केल्यानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली होती. अभिनेत्री अधूनमधून भारतात येत असते. ती एसएस राजामौली यांच्या पुढच्या चित्रपटात काम करणार असल्याचे वृत्त आहे. हा नवीन अध्याय सुरु करण्यापूर्वी, अभिनेत्रीने श्री बालाजी मंदिराला भेट दिली आणि आशीर्वाद घेतले. यासाठी प्रियांकाने राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी यांचे आभार मानले आहेत. कारण हे दर्शन घडवून आणण्यासाठी उपासना हिने प्रियांकाची मदत केली. प्रियांका चोप्राने तिचे बालाजी मंदिराला भेट देतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
यादरम्यान अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती निळ्या सलवार सूटमध्ये नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिच्या डोक्यावर स्कार्फ आहे आणि कपाळावर टिळक आहे. हे फोटो शेअर करताना प्रियांका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, “श्री बालाजीच्या आशीर्वादाने एक नवीन अध्याय सुरु होत आहे. आपल्या सर्वांच्या हृदयात शांती असो आणि सर्वत्र समृद्धी आणि विपुलता असो. देवाची कृपा अनंत आहे. ओम नमो नारायणय”.
तिने तिच्या या पोस्टमध्ये राम चरणची पत्नी उपासना कामेनेई यांचेही आभार मानले आहेत. यापूर्वी अशी अफवा पसरली होती की प्रियांका चोप्रा महाकुंभाला आली आहे. खरंतर, तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता, जो पाहून लोकांना अंदाज आला की तो प्रयागराजचा आहे, पण ती हैदराबादमध्ये होती. प्रियांकाने २००२ मध्ये ‘थामिझान’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. यानंतर, तिने ‘द हिरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्यानंतर २०१७ मध्ये त्याने ‘बेवॉच’ चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती शेवटची २०१९ मध्ये ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटात दिसली होती. तिच्या ‘जी ले जरा’ बद्दल फारसे अपडेट्स नाहीत. ती ‘हेड्स ऑफ स्टेट’ आणि ‘द ब्लफ’ मध्ये देखील असेल.