आज अनेक मराठी कलाकारांना केवळ मराठी मधेच नाही तर बॉलीवूड, टॉलिवूड मध्ये देखील झळकताना पाहतो. उत्तम अभिनयाच्या जोरावर विविध भाषिक चित्रपट, वेब सिरीज यांमध्ये कलाकार पोहचतो. सध्या बॉलीवूड मधील रॉकी ओर राणी कि प्रेम कहाणी या चित्रपटात देखील क्षिती जोग ही मराठमोळी अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळते. दिग्दर्शक करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात क्षिती रणवीरच्या आईची भूमिका साकारताना पाहायला मिळते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने २ दिवसात तब्बल २५ कोटींचा गल्ला जमवला आहे. सर्वत्र चित्रपट आणि क्षितीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.(karan johar to kshitee jog)
अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक करण जोहरने देखील क्षितीच्या कामाचं कौतुक केलं आहे. बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार क्षितीबद्दल बोलताना करण जोहर म्हणाला ” क्षितीचा अभिनय मी पाहिला आहे त्यामुळे मला ठाऊक होत कि या भूमिकेला ती न्याय देऊ शकते. मी तिची सेटवरील मेहनत पाहिली आहे ती स्वतःला झोकून देऊन काम करते त्यामुळे कोणतीही भूमिका ती अगदी सहज साकारू शकते”.
हे देखील वाचा- ‘प्रीमियरनंतर नवरा म्हणून ओळख करून दिलीस भारी फिलिंग होतं ते’ हेमंत ढोमेने केलं बायकोचं कौतुक
करण जोहर आणि प्रेक्षकांसह अन्य कलाकारांनी देखील क्षितीचं कौतुक केलं आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील क्षितीचं काम बघून अभिनेता हेमंत ने देखील क्षितीसाठी खास पोस्ट लिहीत तिच्या कामाचं कौतुक केलं होतं. क्षितीने या पूर्वी अनेक मराठी , हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.(kshitee jog in rockey aur rani ki prem kahani)