शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘प्रीमियरनंतर नवरा म्हणून ओळख करून दिलीस भारी फिलिंग होतं ते’ हेमंत ढोमेने केलं बायकोचं कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 29, 2023 | 11:27 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Hemant Dhome Special Post

Hemant Dhome Special Post

अभिनेता हेमंत ढोमे याने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. हेमंतसोबत त्याची पत्नी क्षिती जोगही सिनेविश्वात कार्यरत आहे. क्षितीने मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही बरच काम केलं आहे. नुकताच रिलीज झालेला ‘रॉकी और राणी की कहाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, रणवीर सिंग आणि आलिया भट या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. या चित्रपटात क्षिती जोग ही झळकली. चित्रपटाच्या प्रीमियर शोला क्षिती सोबत हेमंतने ही हजेरी लावली होती, त्यावेळी क्षितीच होणार कौतुक, क्षितीच यश पाहून हेमंतने सोशल मीडियावर क्षितीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने क्षितीच भरभरून कौतुक केलं आहे. (Hemant Dhome Special Post)

हेमंतने पोस्ट करत लिहिलंय की, “पाटलीणबाई, आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस! करण सरांच्या ॲाफिस मधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं, बघता बघता सिनेमाचं शूट झालं… हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!”

पाहा हेमंत ढोमेची बायकोसाठीची खास पोस्ट (Hemant Dhome Special Post)

यापुढे हेमंत ने लिहिलं आहे की, “आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला…तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो! तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय… सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या… त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं… हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय… इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल!

क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण #rockyaurranikipremkahani या चित्रपटाबद्दल Thank you! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता…हेमंत.”

हे देखील वाचा – हिंदी मालिकेचा रिमेक.?का होतोय तेजश्रीच्या नव्या मालिकेचा प्रोमो ट्रोल

हेमंतने क्षितीच भरभरून कौतुक करणारी पोस्ट सध्या चर्चेत आहे. हेमंतच्या या पोस्ट वर अनेक कलाकार मंडळींनी क्षितीसाठी हार्ट ईमोजी शेअर केली आहे.

Tags: bollywood moviehemant dhomekshitee jogrocky aur rani ki prem kahani
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Virat Kohli Fitness
Lifestyle

वाढतं वजन, धावायलाही अवघड, स्वतःचीच लाज वाटू लागली अन्…; विराट कोहलीने असं कमी केलं वजन

मे 15, 2025 | 7:00 pm
navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Next Post
Dada Kondke movies rights

दादा कोंडकेंचे 'हे' १२ चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार ! मुंबई हायकोर्टाने दिले 'हे' महत्वाचे आदेश

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.