शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं वय २८ होतं आणि…”, प्रसिद्धीच्या झोतात असताना मृणाल दुसानीसने लगेचच लग्न करण्याचा निर्णय का घेतला?, म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 14, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunal Dusanis On Career Turning Point

"माझं वय २८ होतं आणि…", प्रसिद्धीच्या झोतात असताना मृणाल दुसानीसने लगेचच लग्न करण्याचा निर्णय का घेतला?, म्हणाली, "माझ्या आयुष्यात…"

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहऱ्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री मृणाल दुसानिस. मृणालने आजवर अनेक मालिकांमधून चाहत्यांच्या मनात घर केलं. ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून मृणालने लोकप्रियता मिळवली. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेमुळे मृणालला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकाविश्वात कार्यरत असणारी ही अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून सिनेविश्वपासून दूर आहे. (Mrunal Dusanis On Career Turning Point)

मृणालने २०१६ साली नीरज मोरेसह लग्नगाठ बांधली. लग्नानंतर काही वर्ष तिने काम केले. मात्र मृणालचा नवरा हा कामानिमित्त अमेरिकेत राहत असल्याने ती देखील अमेरिकेला निघून गेली. त्यामुळे गेली चार वर्ष मृणाल सिनेसृष्टीपासून दूर आहे. आयुष्यात करिअरच्या शिखरावर असताना मृणालने हा लग्न करण्याचा आणि लग्नानंतर मालिकाविश्वातून ब्रेक घेत कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात करिअरच्या कलाटणी देणाऱ्या टप्प्यांवर असताना मृणालने लग्नाचा आणि लग्नानंतर ब्रेक घेण्याचा निर्णय का घेतला याबाबत सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Kartiki Gaikwad : मुलगा झाला हो! कार्तिकी गायकवाडने मुलाला दिला जन्म, घरी चिमुकल्याच्या आगमनासाठी जय्यत तयारी, म्हणाली, “हा क्षण मी…”

View this post on Instagram

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

मृणाल याबाबत बोलताना म्हणाली, “मी कधीच काहीच ठरवून करत नाही. मी परिस्थितीनुसार पुढे जाणारी मुलगी आहे. मला असं वाटलं की, माझं आता लग्नाचं वय आहे. आणि तेव्हा माझं २८ वय होतं. तर मला असं वाटलं की, आता चांगला मुलगा आयुष्यात आला आहे आणि ही योग्य वेळ आहे, असंही वाटलं. लग्नानंतर माझं करिअर थांबलं अशातला काही भाग नाही. मी इकडे काम करत होते, तोही तिकडे काम करत होता. तेव्हा आमचं असंच ठरलं होतं की, सध्या आपण काही वर्ष एकमेकांच्या कामांना प्राधान्य देऊया. तेव्हा आम्ही वेळ मिळेल तसे एकमेकांना भेटायचो”.

आणखी वाचा – Video : बायकोच्या वाढदिवसाला राणादा जोमात, हॉटेलमध्ये सरप्राइज पार्टी, धमाल-मस्ती अन्…; सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री पुढे म्हणाली, “कधी तो अमेरिकेतून यायचा तर कधी मी बाहेरगावी कुठे गेले तर तो तिथे यायचा. तर तेव्हा आम्ही असा क्वालिटी टाइम एन्जॉय करायचो. आणि मुळात तेवढा समजूतदारपणा त्याच्यात आहे. ‘हे मनं बावरे’नंतर आम्हाला असं वाटलं की, आम्ही खूप एकटे राहिलो आहोत. आता आपण भेटूया आणि कुटुंबालाही थोडा वेळ देऊयात. दोघांच्या सहमताने हा निर्णय घेतला म्हणून हे सर्व शक्य झालं, असं मला वाटतं”.

Tags: marathi actressmrunal dusanismrunal dusanis careerMrunal Dusanis On Career Turning Point
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Marathi Actor Shashank Ketkar expressed his anger over the Ghatkopar hoarding collapse case

"लाजा वाटत नाहीत का?", घाटकोपरमधील 'त्या' होर्डिंग प्रकरणी शशांक केतकरचा संताप, म्हणाला, "आमच्या जीवाशी खेळणं बंद करा"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.