कलाकार कसं आयुष्य जगतात?, त्यांची लाइफस्टाइल काय? याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. बरेच चाहते आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला फॉलो करतात. गरोदर अभिनेत्रींबाबत तर विशेष चर्चा रंगताना दिसते. काही अभिनेत्री गरोदरपणात स्त्रियांसाठी खास टिप्स शेअर करताना दिसतात. आता अशाच एका अभिनेत्रीचं गरोदरपण चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री कल्की कोचलिनने पाण्यातच मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. हा तिचा निर्णय खूपच महत्त्वपूर्ण होता. या संपूर्ण प्रक्रियेला ‘वॉटर बर्थ’ असं म्हणतात. कल्कीने जेव्हा मुलाला पाण्यात जन्म दिला तेव्हा तिला अनेकांनी चुडैल म्हणून हिणवलं. पण वॉटर बर्थ हा सर्वोत्तम उपाय असल्याचं तिने म्हटलं आहे. (kalki koechlin water birth)
कल्कीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वॉटर बर्थबाबत सांगितलं. तसेच हा उपाय करणं किती फायदेशीर आहे? याविषयीही माहिती दिली. ती म्हणाली, “पाण्यात डिलिव्हरी होणं शरीरासाठी अधिक फायदेशीर असतं. जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा ही प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरते. याबाबत बरंच संशोधनही करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया आई व मुलासाठी उत्तम असते. यामध्ये काहीच घाबरण्यासाठी गोष्ट नाही. वॉटर बर्थमुळे डिलिव्हरीनंतर महिला लवकर बरी होते”.
आणखी वाचा – पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष
पुढे ती म्हणाली, “सार्वजनिकरित्या या प्रक्रियेबाबत अजूनही जागृती करण्यात आलेली नाही. वॉटर बर्थ आर्थिकदृष्ट्या अधिक महाग आहे. त्यामुळे लोक याचा वापर करत नसावे असं वाटतं. पण काही ठिकाणी वॉटर बर्थ प्रक्रियेचा वापर करण्यात येतो. रुग्णालयामध्येही हे करता येतं. पण लोकांना याबाबत काहीच कल्पना नाही”.
आणखी वाचा – “डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी, ७७ दिवसांनंतर…
“वॉटर बर्थ म्हटलं की, लोकांना ती विचित्र काहीतरी प्रथा आहे असं वाटतं. भूत वगैरे असं कायतरी अनेकांना वाटतं. मला नाही माहित लोक नक्की काय काय विचार करतात”. कल्कीने मात्र वॉटर बर्थच्या आधारे मुलाला जन्म दिला. या प्रक्रियेमध्ये कोमट पाण्याच्या पूलमध्ये गरोदर स्त्रीला ठेवलं जातं. त्यानंतर तिची डिलिव्हरी केली जाते. यामुळे त्रास फार कमी प्रमाणात होतं असं संशोधनातून समोर आलं आहे.