मराठी कलाविश्वात अनेक रिअल लाईफ जोड्या या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. यातील एक जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. यांना मराठी चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणून ओळखलं जातं.ते दोघेही सोशल मीडियावर बऱ्याच फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेचा विषय ठरतात. तर अश्याच एका फोटोमुळे सध्या मिताली मयेकर ही चर्चेत आली.(Mitali Mayekar)

मिताली मयेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. आणि या पोस्टमधील फोटोमुळे ती चर्चेत आली. कारण या पोस्टमध्ये ती चक्क अंघोळ करताना दिसते. तिने अंघोळ करताना एक फोटो शेअर करत याला कॅप्शन देत तिने ‘अपवित्र’ असे म्हटले आहे. तिचा हा न्यूड फोटो पाहून अनेक चाहते हे चकित झालेत. मिताली ही सध्या मध्य प्रदेशात फिरण्यासाठी गेली आहे. तिने शेअर केलेला हा फोटो बांधवगड जंगल सफारीदरम्यानचा आहे. आणि या फोटोवर तिला चाहत्यांकडून संमिश्र कॉमेंटचा प्रतिसाद मिळतोय.(Mitali Mayekar)
=====
हे देखील वाचा-कोकणची लोकधारा जपत प्रभाकर मोरेंनी फॉरेनर्सला लावले थिरकायला
====
काहींनी तिच्या या फोटोला हॉट असं म्हणत पसंती दिली आहे तर काहींनी, अंघोळ करायला कोणी एवढ्या लांब जातं का?,पावसाळ्यात अश्या ठिकाणी अंघोळ कशी करायची. अश्या अनेक मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. या फोटोवर मितालीच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने कमेंट केली आहे. “काय पण हे फोटोस टाकणं. मी एवढ्या लांब असताना.” अशी कमेंट करत त्यावर एक हार्ट इमोजी दिलाय.(Mitali Mayekar)
तसेच मिताली ही ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून झळकली. तर तिने काही चित्रपटात देखील काम केलंय. तर तुम्हाला मितालीचा हा फोटो आवडतो का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.