शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा, रुग्णालयामधून घरी आणलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 2:09 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
kajol devgan mother actress tanuja health update discharged from hospital on monday evening

काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा, रुग्णालयामधून घरी आणलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई व ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती अचानक खालवली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्रीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तेव्हापासून तनुजा यांचे असंख्य चाहते त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशा परिस्थितीत तनुजा यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. तनुजा यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. (Actress Tanuja Discharged From Hospital)

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, तनुजा यांना सोमवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या वयोमानानुसार काही शारीरिक आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्या बऱ्या असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. अभिनेत्री तनुजा यांना रविवारी सायंकाळी मुंबईतल्या जुहूमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. वयोमानानुसार उद्भवत असणाऱ्या काही आजारांमुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले असल्याचे म्हटले गेले होते.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

आणखी वाचा – Video : भावाच्या लग्नामध्ये बहिणीसह हॉलच्या गेटवरच नाचली ऋतुजा बागवे, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांची मुलगी, तनुजा यांनी हिंदी व बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी मोठी बहीण नूतन यांच्याबरोबर बालकलाकार म्हणून ‘हमारी बेटी’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘बहारें फिर भी आएंगी’, ‘पैसा या प्यार’, ‘हाथी मेरे साथी’ व ‘मेरे जीवन साथी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आणखी वाचा – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ऐतिहासिक ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष

तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला आहे. लहान वयातच त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी तनुजा यांनी ‘छबिली’ या पहिल्या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यांचा हा पहिला चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झाला होता. तनुजा व चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांनी १९७३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. शोमू मुखर्जी व तनुजा यांना काजोल व तनिषा अशा दोन मुली आहेत.

Tags: bollywood actressbollywood newsentertainmentkajol
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dilip Joshi Son Wedding

अवाढव्य खर्च, बेभान होऊन नाचले अन्…; 'तारक मेहता…'मधील जेठालालच्या लेकाचा शाही विवाहसोहळा, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.