Divya Pugaonkar Wedding : मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर सध्या सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरच्या लग्नाची विशेष चर्चा सुरु आहे. यापाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नाकडे अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. ही अभिनेत्री म्हणजे लक्ष्मी निवास फेम अभिनेत्री दिव्या पुगांवकर. बरेच दिवसांपासून दिव्याच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर दिव्या आज अक्षय घरतसह लग्नबंधनात अडकली आहे. दिव्या आणि अक्षयच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांच्या लग्नातील या खास फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
दिव्या व अक्षय यांचा लग्नातील मराठमोळा लूक खूप खास होता. दिव्या व अक्षयचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. दिव्याच्या पारंपरिक लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचबरोबरीने तिने परिधान केलेल्या पारंपरिक दागिन्यांनी सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.तर अक्षयचा लूकही खूप खास होता, तो देखील नवऱ्यामुलाच्या वेशात खूप सुंदर दिसत होता. अखेर सातफेरे घेत अक्षय व दिव्या या जोडीने लग्नगाठ बांधली आहे. दिव्याने नेसलेली पिवळ्या रंगाची डिझाइनर नऊवारी साडी खूप खास दिसत होती. त्यावर घातलेले पारंपरिक दागिने तिच्या लुकमध्ये भर घालत होते
आणखी वाचा – लगीनघाईत अंकिता वालावलकरच्या गाडीचा अपघात, मोठं नुकसान पण दोघेही सुखरूप, व्हिडीओद्वारे दाखवली झलक
दिव्याच्या लग्नात कुटुंबिय तर अगदी धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. तसेच मित्र परिवाराने कमालीचा दंगा घातला. यावेळी सेटवरील अनेक कलाकार मंडळी दिव्याच्या लग्नाला हजर होते. लक्ष्मी निवास मालिकेची टीमही दिव्याच्या लग्नाला उपस्थित होती. लग्नापूर्वी दिव्याच्या मेहंदी, संगीत, साखरपुडा समारंभाचीही झलक पाहायला मिळाली. यावेळच्या तिच्या लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या. साखरपुड्यासाठीही दिव्याचा मराठमोळा लूक खूप खास होता. दिव्याच्या लाघवी सौंदर्यावर मराठमोळा लूक अगदी शोभून दिसला.
आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, संगीत सोहळ्यातही नवऱ्यासह बेभान होऊन नाचली, व्हिडीओ समोर
दिव्याचा नवरा अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे. ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमधून दिव्या घराघरांत लोकप्रिय झाली. या दोन्ही मालिकांमध्ये दिव्याच्या मुख्य भूमिका होत्या. यानंतर सध्या दिव्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाच्य भूमिकेत झळकताना दिसत आहे.