Santosh Juvekar Troll : ‘छावा’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे. ब्लॉक बस्टर अशा या चित्रपटात मराठी कलाकारांचीही दमदार कामगिरी पाहायला मिळाली. या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकरही झळकला. संतोषच या चित्रपटातील भूमिकेला घेऊन प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं. यापूर्वीही संतोषने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करत रसिकांच्या मनावर राज्य केलं.
‘छावा’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला संतोष जुवेकरनेही हजेरी लावली. या कार्यक्रमाला ए आर रेहमान आणि वैशाली सामंत यांनी लाइव्ह सादरीकरण केलं. यावेळी संतोष पहिल्यांदा ए आर रेहमान यांना भेटला याबाबत त्याने भावुक पोस्ट शेअर केली. ए आर रेहमान यांच्यासह एकच रंगमंच शेअर करताना संतोष जुवेकर भारावून गेला. याबाबतची पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर शेअर केली. दरम्यान या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला ट्रोल करण्याची एकही संधी काही सोडली नाही.
आणखी वाचा – काजोल व अजय देवगणमध्ये बिनसलं?, ‘त्या’ पोस्टवरुन चर्चांना उधाण, नेमकं काय घडलं?
संतोषने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “काल ‘छावा’ सिनेमाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला… कमाल…! माझ्यासाठी डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा झाला. कारणही तसंच होतं. आजच्या काळातील संगीत जगतातला बादशहा ज्याला म्हटलं जातं. तो सम्राट ए आर रेहमान यांना याची देही याची डोळा अगदी पहिल्या रांगेत बसून पाहण्याची आणि कानभरून ऐकण्याची संधी मिळाली. मग कार्यक्रम झाल्यावर संपूर्ण टीमला रंगमंचावर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं. रंगमंचावर गेलो रेहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं. सरळ त्यांच्या जवळ गेलो त्यांच लक्ष नव्हतं तेव्हा आमच्या विकी भाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रेहमान सरांना हाताला धरुन वळवून माझी ओळख (तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करुन दिली”.
संतोषच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर संतोषनेही नेटकऱ्याला त्याच्याच भाषेत प्रतिउत्तर दिलेलं पाहायला मिळालं. संतोषच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत असं म्हटलं की, “का इतका कमीपणा?”. यावर संतोषने प्रतिउत्तर देत म्हटलं की, “मित्रा मी स्वतःला स्टार समजण्यापेक्षा ते माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मला एक कलाकार म्हणून समजणं जास्त महत्त्वाचं वाटतं”. तर यापुढे आणखी एक कमेंट करत तो म्हणाला की, “स्टार होणं हे आपल्या कष्टाने आणि त्या कष्टाला फक्त प्रेक्षक नावाच्या देवाचा आशीर्वाद असावा लागतो”.