शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, अ‍ॅक्शन, थ्रिलर आणि रोमान्सने भरलेले चित्रपट व सीरिज लवकरच भेटीला

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 5, 2024 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Kajal Devgan, Kriti Sanon's Do Patti and Shraddha Kapoor Stree 2 will release on OTT in October.

ऑक्टोबर महिन्यात काजल देवगन, क्रिती सेनन यांचा दो पत्ती व श्रद्धा कपूरचा स्त्री २ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्स आणि बॉलिवूडमधील बदलत्या ट्रेंड्सचा आढावा घेतल्यास, ऑक्टोबर महिना हा सिनेसृष्टीसाठी निर्णायक टप्पा ठरू शकतो. थालापती विजयच्या ‘गोट’पासून, काजोलच्या ‘दो पत्ती’पर्यंत अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. ‘गोट’, ‘सीटीआरएल’, ‘दो पत्ती’, ‘द सिग्नेचर’ यांसारखे चित्रपट व सीरज यंदाच्या आठवड्यात ओटीटीवर धडकले आहेत. ओटीटी आणि चित्रपटगृह यांच्यातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांना घरबसल्या दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी अनुभवता येणार आहे आणि साहजिकच प्रेक्षकांसाठी ही सुखावणारी बाब आहे. त्यामुळे आगामी ऑक्टोबर महिना ओटीटी प्रेमींसाठी मनोरंजक असणार आहे. चला जाणून घेऊ या महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट व सीरिज कोणते आहेत.

गोट : हा सिनेमा आधीच बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करून गेला आहे. आता तो ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. अ‍ॅक्शन आणि थरार असं मिश्रण असलेला हा चित्रपट विजयच्या चाहत्यांसाठी पर्वणी आहे. ३ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

द ट्राइब : करण जोहर निर्मित ‘द ट्राइब’मध्ये इन्फ्लुएन्सर्सची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. काही एन्फ्लुएन्सर्स लॉस एंजेलिसमध्ये जातात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंटेंटचे शूटिंग कसे करतात हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ४ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकतो.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचं ३८व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, शूटला असताना कळालं अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

दो पत्ती : काजोल आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दो पत्ती’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोल पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा मिस्ट्री थ्रिलर २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा विजेता अभिजीत सावंतच असणार?, बॉलिवूडकरांचा मोठा पाठिंबा, म्हणाले, “तोच जिंकावा आणि…”

स्त्री २ : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘स्त्री २’ १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. येत्या ११ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहता येणार आहे.  

Tags: Do PattiOTT Marathi Newsott newsStree 2
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Aishwarya Narkar On Bigg Boss Marathi

"'बिग बॉस'साठी विचारणा झाली तर होकार देणार का?" ऐश्वर्या नारकरांना प्रश्न विचारताच दिलं उत्तर, म्हणाल्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.