शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दहिसर टोल नाक्यावरील ट्राफिकमुळे जुई गडकरी त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाली, “या वाहतूक कोंडीत…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 16, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
jui gadkari stuck in traffic

दहिसर टोल नाक्यावरील ट्राफिकमुळे जुई गडकरी त्रस्त, बराच वेळ एकाच जागी, म्हणाली, "या वाहतूक कोंडीत…"

jui gadkari stuck in traffic : कलाकार मंडळी सोशल मीडियावर काहीना काही शेअर करत व्यक्त होतात. आणि यामार्फतच ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. कधी आपले फोटो-व्हिडीओ तर कधी कामाबद्दलची माहिती देत ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. कलाकार मंडळी अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीवरही भाष्य करतात. मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार मंडळी रोजच्या आयुष्यातील सामाजिक प्रश्नांवर आपलं मत मांडतात, त्यांना आलेले अनुभव शेअर करतात. अशीच रोजच्या आयुष्यातील सर्वांच्या त्रासाची गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी. सध्या पावसामुळे मुंबईसह इतर सर्व शहरात वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर झाली आहे.

या वाहतूक कोंडीचा सामना सामान्य जनतेसह कलाकारांनाही करावा लागत आहे. याच समस्येबद्दल ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. बरेच असे कलाकार आहेत जे शूटिंगसाठी मुंबई-ठाणे हा प्रवास करताना दिसतात. आणि या प्रवासादरम्यान त्यांना वाहतूक कोंडीचा सामना हा करावाच लागतो. आणि ट्राफिकमुळे या कलाकारांना एक,दोन तास उशिरा सेटवर पोहोचावं लागतं, तर बरेचदा शूट संपल्यावरही ही मंडळी ट्राफिकमध्ये अडकल्यावर उशिरा घरी पोहोचतात. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार मंडळींनी यावर पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर कुलदैवतेच्या दर्शनाला पोहोचला अक्षय केळकर, पत्नीसह कोकण गाठलं अन्…; साधेपणाने वेधलं लक्ष

अशातच आता ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीही वाहतूक कोंडीच्या या समस्येची शिकार झाली आहे. जुईने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मुंबईत रविवारी सुरु झालेल्या पावसाने अनेक भाग जलमय झाले आहेत आणि अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुरु आहे. अशातच जुई गडकरी दहिसर टोल नाक्यावर होणाऱ्या ट्राफिकमध्ये अडकली असल्याचं तिने व्हिडीओद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा – आई-बाबांसाठी शुभंकर तावडेने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo

जुईने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “अर्धा तास झाला मी या वाहतूक कोंडीत अडकले आहे. ठिकाण – दहिसर टोलनाका”. या व्हिडीओसह कॅप्शनमध्ये जुईने संताप व्यक्त करणारा ईमोजी जोडला आहे. सध्या जुई ‘ठरलं तर मग’ मालिकेतील तिच्या सायली या भूमिकेमुळे अधिक चर्चेत आली आहे.

Tags: jui gadkariTharla Tar Magtraffic
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Indrayani River Kundmala Bridge

"पर्यटकांचाही तितकाच दोष…", कुंडमाला दुर्घटनेप्रकरणी हेमंत ढोमे भडकला, म्हणाला, "योजनांना पैसे वाटप करण्यापेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.