Marathi Actor New Home : कालच फादर्स डे झाला. अनेकांच्या स्टेट्सला फादर्स डेच्या पोस्ट होत्या. वडिलांचे फोटो शेअर करत त्यांचे आभारही अनेकांनी मानले होते. यादरम्यान पाहता पाहता एक स्टेट्स समोर आलं आणि त्यात लिहिलं होतं की, “वडिलांना काय शुभेच्छा द्यायच्या त्यांच्या शुभेच्छांमुळेच मी आज आहे”. हो. या एका वाक्यात खूप ताकद आहे. वाचून पटलं. पण फादर्स डे हा दरवर्षीप्रमाणे साजरा हा व्हायलाच हवा असं म्हणत अनेकांनी खास साजरीकरण केलं. अनेक कलाकारांनीही त्यांच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलेल्या पाहायला मिळाल्या. अशातच एका कलाकार बाप-लेकाच्या जोडीसाठी यंदाचा फादर्स डे अधिक स्पेशल होता. ही कलाकार जोडी म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे आणि अभिनेता शुभंकर तावडे.
शुभंकर तावडेने त्याच्या वडिलांसाठी यंदाचा फादर्स डे खास भेट देत स्पेशल केला. शुभंकर आणि त्याच्या बहिणीने मिळून त्याच्या वडिलांना भेट म्हणून नवं घर घेऊन दिलं आहे. प्रत्येकाचे स्वतःच घर असावं असं स्वप्न असतं, आणि हे स्वप्न अनेकजण मेहनतीच्या जोरावर पूर्ण करतात. मात्र हे स्वप्न शुभंकरने आणि त्याच्या बहिणीने मिळून त्यांच्या वडिलांसाठी पूर्ण केलं आहे. शुभंकर व त्याची बहीण अंकिता हिने वडिलांसाठी आलिशान असं घर खरेदी केलं आहे. फादर्स डेचे औचित्य साधत त्याने वडिलांसाठी नवं घर घेतल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
आणखी वाचा – संजय कपूरच्या १०,३०० कोटींच्या मालमत्तेचा वारस कोण?, करिश्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार?, दरमहा तब्बल…
“आमचं तावडे निवास. एका नव्या अध्यायाची सुरुवात. शुभू आणि मी तुम्हा सर्वांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आमच्या आई-बाबांसाठी एक छानसं घर खरेदी केलं आहे. या नवीन घरामुळे आमच्या घराचा पत्ता नक्कीच बदलेल. पण, खरंतर आई-बाबांनी एवढी वर्षे आमच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे या घराच्या रुपात आमच्याकडून आई-बाबांना ही छोटीशी भेट. प्रेम आणि आशीर्वादांनी परिपूर्ण असलेलं आमचं हक्काचं हे तावडे निवास…”.
आणखी वाचा – “प्रेग्नन्सीमध्ये ९२ किलो वजन झाले आणि…”, क्रांती रेडकरचा फिटनेसबाबत खुलासा, म्हणाली, “मुलींच्या जन्मानंतर…”
“आमच्या या नव्या घरात असंख्य सुंदर आठवणी निर्माण करण्यास आम्ही उत्सुक आहोत. विथ लव्ह… अंकिता शुभंकर प्रवीण” असं अभिनेत्याच्या बहिणीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर कलाविश्वात अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





