Akshay Kelkar Kokan Video : अभिनेता अक्षय केळकरने आजवर अनेक मालिका आणि रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या विजेतेपदावरही अक्षयने नाव कोरलं. या शोमुळे अक्षयला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यानंतर अक्षय पुन्हा एकदा चर्चेत आला तो त्याच्या लग्नामुळे. अक्षय गेल्या महिन्यात लग्नबंधनात अडकला. दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्याने त्याची गर्लफ्रेंड साधनाबरोबर लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर अक्षय सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तसेच तो नेहमीच vlog मधून त्याच्या चाहत्यांसह अपडेट्स देत असतो.
अक्षयने त्याच्या युट्युब चॅनेलवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. लग्नानंतर अक्षय त्याची पत्नी साधनासह त्याच्या कोकणातील गावी कुलदेवतेच दर्शन घ्यायला गेला होता आणि याचा खास व्हिडीओ त्याने युट्युबवर शेअर केला आहे. कुलदेवतेच्या दर्शनाला अक्षय आई, बहीण आणि पत्नीसह कोकणात गेला होता. अक्षयने युट्युबवर शेअर केलेल्या या खास व्हिडीओमध्ये तो पत्नीबरोबर कुलदैवत दाभलेश्वरचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंदिराबाहेर असणाऱ्या चाफ्याच्या झाडाखालील चाफ्याची फुले गोळा करून त्यांनी ती फुल देवाला वाहिली.
आणखी वाचा – संजय कपूरच्या १०,३०० कोटींच्या मालमत्तेचा वारस कोण?, करिश्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार?, दरमहा तब्बल…
तसंच यानंतर अक्षय आणि साधना यांनी देवाच्या चरणी नारळ वाहिला आणि दोघांनी मिळून दर्शनही घेतलं. यानंतर त्यांनी समुद्राजवळच्या एका रिसॉर्टवर जात तिथेसुद्धा एन्जॉय केले. लग्नानंतर अक्षय त्याच्या पत्नीला अधिक वेळ देताना दिसत आहे. अक्षय पत्नीबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. अक्षय व साधना यांनी ९ मे रोजी पारंपरिक अंदाजात शाही विवाहसोहळा उरकला. अक्षय त्याची पत्नी साधनाला रमा अशी हाक देतो.
आणखी वाचा – आई-बाबांसाठी शुभंकर तावडेने खरेदी केलं नवं घर, गृहप्रवेशासाठी एकत्र आलं कुटुंब, पाहा Inside Photo
अक्षय केळकरने ‘बिग बॉस मराठी ४’ मध्ये सहभाग घेतला होता. याशिवाय त्याने ‘ढोलकीच्या तालावर’ या शोमध्ये सूत्रसंचालन केलं होतं. इतकंच नाही तर कलर्स मराठीच्या ‘अबीर गुलाल’ या मालिकेत तो मुख्य भूमिकेत होता. तसंच तो ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातही दिसला. तर अक्षयची पत्नी साधना काकतकर ही एक गायिका आहे.





