मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. ‘पुढचं पाउल’, ‘वर्तुळ’, ‘बिग बॉस मराठी’ यांसारख्या अनेक मालिका व कार्यक्रमांमध्ये ती झळकली. सध्या जुई ‘ठरलं तर मग’ या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेत दिसत असून तिच्या ‘सायली’ या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. तसेच, उत्तम कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. त्यामुळे या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवले आहे. केवळ अभिनय नव्हे, तर ती अनेकदा सामाजिक कार्य करताना दिसली असून तिच्या साधेपणाचे नेहमीच कौतुक होत असते. (Jui Gadkari make a Faraal on Tharla tar Mag set)
अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती नेहमीच तिच्या चाहत्यांसह विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करत असते. शिवाय, ती तिच्या मालिकेचे अपडेट्स बरोबर तिच्या सामाजिक कार्याची माहिती देत असते. असाच एक व्हिडीओ नुकतंच तिने शेअर केला असून त्या व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे. जुई तिच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र असून ती या सेटवर नेहमीच विविध छंद जोपासत राहते. कधी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना, तर कधी गाणे गाताना. आता जुई मालिकेच्या सेटवर फराळ बनवताना दिसली, ज्याचा एक व्हिडीओ नुकतंच तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हे देखील वाचा – Video : …अन् लग्न लागताच मंडपामध्येच नाचू लागले प्रसाद जवादे व अमृता देशमुख, पाहुणेमंडळीही बघत बसले आणि…; व्हिडीओ तुफान व्हायरल
समोर आलेल्या या व्हिडिओत जुईची सहकारी करंजीच्या पोळ्या लाटताना दिसत असून ती त्या पोळ्यांमध्ये सार भरवत आहे. तर सेटमधील अन्य सहकारी कारंजी तळताना दिसले आहे. “स्वयंपाक करणारी टीम नेहमीच एकत्र राहते. मागच्या वेळेस आम्ही मोदक बनवले. आता मुरडीच्या करंज्या! हो, मी सेटवर ‘फराळ’ बनवत आहे.”, असं त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणत तिने फराळ बनवताना एक झलक चाहत्यांना दाखवली.
हे देखील वाचा – Video : घरचं जेवण अन्…; सासरकडील मंडळींच्या प्रेमाने भारावली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, “पण आता…”
जुईचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून अनेक जण यावर लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव करत आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “किती सुगरण आहेस तू जुई! देव तुला सुखात ठेवो!”. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “मस्त सुंदर… छान बनवले आहे करंजी.”. त्याचबरोबर एका नेटकऱ्याने “घडी घालून करंजी, सुगरण आहात तुम्ही. आता लग्नासाठी स्थळ येणार”, अशी गमतीशीर कमेंट केली आहे. एकूणच जुईच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा होताना दिसत असून याआधी तिचा सेटवर अंगाई गायल्याचा एक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल झाला होता.