आज भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा अंतिम सामना रंगणार असून या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. केवळ सामान्य जनताच नाही, तर मराठी कलाकार मंडळींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. कोणता संघ यंदाचा विश्वचषक जिंकणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून भारतीय संघ जिंकावा, यासाठी अनेक जण मंदिरांमध्ये जाऊन साकडे घालत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक असून तिची एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. (Prajakta Mali prays ganpati bappa for India win cricket world cup)
अनेक चित्रपट, मालिका आणि कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणारी प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे देवदर्शनाचे अनेक फोटोज नेहमी चाहत्यांसह शेअर करते. नुकतंच प्राजक्ता देवदर्शनाला गेली होती. ज्यात तिने भारतीय संघाच्या विजयासाठी गणपती बाप्पाकडे साकडे घातले आहे. प्राजक्ताने नुकतंच थेऊर येथील चिंतामणी गणपतीचे दर्शन घेतले असून यावेळी तिने भारतीय संघ अंतिम सामना जिंकावा, यासाठी प्रार्थना केली. तिने इंस्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले असून “आजची मॅच जिंकू दे रे देवा”, असं कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताने यावेळी पांढऱ्या रंगाची साडी, तसेच त्यावर शोभेल असे दागिने परिधान केले असून ती यामध्ये सुंदर दिसत आहे.
हे देखील वाचा – Video : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सेटवरच बनवला दिवाळीचा फराळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही…”
प्राजक्ताच्या देवदर्शनाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी यावर कमेंट करतात म्हणाला, “हो प्राजु आपणच जिंकणार नक्की. गणपती बाप्पा मोरया”. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तू बाप्पाकडे मागणं केलं, म्हणजे ही इच्छा नक्की पूर्ण होणार.” तिसरा नेटकऱ्याने “तू बोलली आणि संघाला शुभेच्छा दिल्या, म्हणजे आपणच जिंकणार.”, अशी कमेंट करत तिच्या लूकचे कौतुक केले. एकूणच, प्राजक्ताच्या या पोस्टची आणि लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – Video : साध्याच घरात राहिली, अस्सल गावरान जेवण अन्…; सासरकडील मंडळींच्या प्रेमाने भारावली क्रांती रेडकर, म्हणाली, “पण आता…”
दरम्यान, प्राजक्ता काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकली होती. त्याचबरोबर, सोशल मीडियावरील तिच्या फोटोशूट्स व योग व्हिडिओची नेहमीच चर्चा होते. नुकतंच प्राजक्ता राजकीय नेत्यांबरोबरच्या फोटोंमुळे चर्चेत आली होती. ती सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या चित्रीकरणात व्यग्र असून तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.