मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक नवं नवीन चेहरे समोर येत आहेत. तरी या नवीन चेहऱ्यांमध्ये काही कलाकार त्यांच्या साधेपणाने अभिनयातील सहजतेने कायम प्रेक्षकांचं मन जिंकतात.असच आपल्या निरागसतेने कायम प्रेक्षकांच्या नजरेत राहणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.(Jui Gadkari Special Date)
जुई तिच्या कामाने कायमच चर्चेत असते. सध्या जुईची स्टार प्रवाह वरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्व्ल स्थानावर आहे.जुईची ‘सायली’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.ती तिच्या प्रत्येक भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करते, तिच्या नवीन कामाने ती तीच जून काम विसरायला प्रेक्षकांना भाग पाडते. पुढचं पाऊल मधल्या कल्याणी इतकीच आज सायली ही प्रेक्षकांना जवळची वाटते,
पाहा कोणासोबत आहे जुईची स्पेशल डेट? (Jui Gadkari Special Date)
जुईच्या वैयक्तिक आयुष्याविषयी ही प्रेक्षकांना उत्सुकता असते,अशीच एक स्टोरी जुईने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केली आहे.त्यात जुई डेट वर गेल्याच पाहायला मिळत आहे. या स्टोरीला जुईने दिलेल्या कॅप्शनने खरं तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, या स्टोरीच कॅप्शन होत, सो, टुडे आय वॉज ऑन अ डेट विथ…तिच्या या स्टोरीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली की जुई कोणासोबत डेट वर गेली असेल? परंतु दुसऱ्याच फोटोने जुईच्या या डेट चा खुलासा केला आणि दुसऱ्या फोटोला तिने कॅप्शन दिल आहे,’फूड’ (Jui Gadkari Special Date)
हे देखील वाचा : चाळिशीतली बंगाली महिला हवी’ म्हणून जुईला दिला नकार
जुई तिच्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत असते. असाच तिचा एका लुक टेस्ट चा फोटो वायरल होतो आहे, बंगाली लुक मध्ये जुई अतिशय सुंदर दिसत आहे.परंतु ती भूमिका तेव्हा जुईला मिळाली नव्हती.कारण त्या भूमिकेसाठी चाळिशीतली बंगाली स्त्री हवी होती. त्या लुक टेस्ट च्या आठवणी जुईने या पोस्ट मधून शेअर केल्या होत्या.