बुधवार, सप्टेंबर 27, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी सरसावली जुई, केले मदतीचे आवाहन

इर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीसाठी सरसावली जुई, केले मदतीचे आवाहन

Majja WebdeskbyMajja Webdesk
जुलै 22, 2023 | 6:09 pm
in Trending
Reading Time: 1 min read
jui gadkari appeals

jui gadkari appeals

मराठी मनोरंजनविश्वातील गोड अभिनेत्री जुई गडकरी सध्या छोट्या पडद्यावरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षांनी टीव्हीसृष्टीत पदार्पण केलेलं असून तिच्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. मनोरंजनविश्वात सक्रिय असणारी जुई फिटनेस फिक्र असण्याबरोबर फिरण्याची प्रचंड आवड आहे. शिवाय सामाजिक कार्यातही ती नेहमीच पुढे असते. (jui gadkari appeals)

तीन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अनेक ग्रामस्थ ढिगाऱ्याखाली अडकले असून गेल्या दोन दिवसांपासून गावात मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी वर्षभरापूर्वी याच गावाजवळ असलेल्या इर्शाळगडावर गेली होती, तेव्हा तिने इर्शाळवाडीतील स्थानिक गावकऱ्यांच्या घरी जाऊन तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला होता.

त्यामुळे ही दुर्घटना जेव्हा घडली, तेव्हा तिने यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले. या पोस्टनंतर आता जुईने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली असून ज्यात ती सर्वांना इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले.

पहा जुईने कशाप्रकारे केले आवाहन (jui gadkari appeal to fans for help of irshalwadi villagers)

जुईने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली असून ज्यात तिने “ईरशाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण, इ. जीवनावश्यक वस्तु तिथपर्यंत माझ्या टीमकडुन पोचवल्या जातील..” अशी पोस्ट करत आपल्या चाहत्यांकडून मदतीसाठीचे आवाहन केले. (jui gadkari appeal to fans for help of irshalwadi villagers)

jui gadkari instagram story

याआधीच्या पोस्टमध्ये जुईने इर्शाळवाडीतील काही आठवणी ताज्या केल्या होत्या. तेव्हा तिने तिथल्या समस्येसोबत तिथल्या गावकऱ्यांचे कौतुक केले होते. शिवाय इर्शाळगडावरील ट्रेकिंग व तिथल्या रस्त्यांवर फिरतानाचा अनुभवही सर्वांसमोर शेअर केला.

jui gadkari facebook post

हे देखील वाचा : केतकीच्या Opposite दिसणार, रोमान्स, ऍक्शनचा पॉवरपॅक असा तडफदार सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का कोण आहे हा अभिनेता?

Tags: irshalwadijui gadkarisocial mediaTharla Tar Mag

Latest Post

Prabhakar More On Shalu Dance
Television Tadka

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

सप्टेंबर 27, 2023 | 2:18 pm
Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17
Television Tadka

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

सप्टेंबर 27, 2023 | 1:35 pm
Myra Vaikul On Ganeshotsav
Television Tadka

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

सप्टेंबर 27, 2023 | 1:33 pm
Tiger 3 Teaser Out
Bollywood Gossip

Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

सप्टेंबर 27, 2023 | 12:32 pm
Next Post
kedar shinde bai pan bhari deva

'बाईपण' मुळे स्वामी घरी आले - केदार शिंदेंची खास पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist