जेनिफर विंगेट हे टेलिव्हिजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचे आणि हटके स्टाइलचे अनेक चाहते आहेत. ‘बेहद’मधील तिची ग्रे शेडमध्ये असलेली भूमिका लोकांना खूप आवडते. जेनिफर विंगेटने ‘दिल मिल गये’, ‘बेहद’, ‘कहीं तो होगा’ व ‘बेपन्ना’सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेनिफरचे व्यावसायिक आयुष्य खूप चांगले असले तरी वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीला खूप दुःखाचा सामना करावा लागला आहे. (Jennifer Winget)
जेनिफर विंगेटने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना केला तरीही तिने कधीही हार मानली नाही आणि आज जेनिफर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. टीव्ही शोच्या सेटवरच ती करण सिंग ग्रोव्हरला भेटली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. मात्र, त्यांचे नाते वर्षभरही टिकले नाही.
जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरला त्याच्या मैत्रिणीबरोबर रंगेहात पकडले होते, असे म्हटले जाते. यानंतर अभिनेत्रीने सर्वांसमोर करणच्या कानाखालीही मारली. पतीकडून फसवणूक झाल्यानंतर जेनिफर खूपच तुटली होती. यानंतर १० महिन्यांत जेनिफर व करणचा घटस्फोटही झाला. करणच्या विश्वासघातानंतर अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात कोणीही जोडीदार मिळाला नाही. अशातच सध्या जेनिफर सिंगल राहून तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे.
सिद्धार्थ कननबरोबर तिच्या घटस्फोटाबाबत बोलताना जेनिफर विंगेट म्हणाली होती की, “त्यावेळी मी इतकी हरवली होती की लोकांना काय सांगावे आणि त्यावर कसे वागावे हेच कळत नव्हते. मला आठवते की माझे मित्र मला बाहेर जाण्यास भाग सांगत होते जेणेकरुन माझं लक्ष विचलित होईल आणि मला कुठेही जाऊ नये असं वाटायचं”. जेनिफर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. आज ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. जेनिफर एका एपिसोडसाठी १.५ लाख रुपये घेते आणि तिची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये आहे.