शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वडिलांच्या अचानक निधनामुळे पूर्णपणे खचला जय दुधाणे, ‘बिग बॉस मराठी’मध्ये आलेला व्हिडीओ केला शेअर, दुःख अनावर

Saurabh Moreby Saurabh More
जून 27, 2024 | 2:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jay Dudhan shared video in memory of his father.

Video : वडिलांच्या अचानक निधनामुळे पूर्णपणे खचला जय दुधाणे, 'बिग बॉस मराठी'मध्ये आलेला व्हिडीओ केला शेअर, दुःख अनावर

‘बिग बॉस मराठी’मधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता जय दुधाणे व त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जयचे वडील अनिल दुधाणे यांचे २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची बातमी दिली. सोशल मीडियावर वडिलांबद्दल खास पोस्ट करत ‘मी माझा सुपरहिरो गमावला’ असल्याची भावूक प्रतिक्रिया व्यक्त करत जयने त्याच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. या पोस्टमध्ये जयने आपल्या भावना व्यक्त करता “मी हे शेअर करेन असे कधी वाटले नव्हते. २४ जूनच्या मध्यरात्री कार्डियाक अरेस्टमुळे मी माझा सुपरहिरो गमावला. ते फक्त आमच्या कुटुंबासाठीच नाही तर त्यांच्या ओळखीच्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची व्यक्ती होते” अशा भावना व्यक्त केल्या.

जयने वडिलांच्या निधनाबद्दलची पोस्ट शेअर करताच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. जयच्या अनेक मित्रपरिवाराने त्याला कमेंट्सद्वारे खंबीर राहण्याविषयीही सांगितले आहे.  तसेच त्याच्या अनेक चाहत्यांनीही सांत्वन केले. अशातच आता जयने त्याच्या वडिलांबद्दलची खास आठवण व्यक्त करत आणखी एक भावुक व्हिडीओ शेयर केला आहे. जयने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा घरात जयला भेटण्यासाठी त्याचे आई-वडील घरात आले होते. याच खास क्षणांचा व्हिडीओ जयने शेअर केला आहे आणि या व्हिडीओखाली त्याने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by J A Y D U D H A N E (@jaydudhaneofficial)

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातील पहिला स्पर्धक घराबाहेर, सुप्रसिद्ध स्पर्धकाची आश्चर्यकारक एक्झिट

या पोस्टमध्ये जयने असं म्हटलं आहे की, “हे वाईट स्वप्न कधीच खरे नसावे अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या वडिलांना टेलिव्हिजनद्वारे तुम्हा सर्वांची ओळख करून दिली याबद्दल मला आनंद आहे. माझे वडील हे एका अप्रतिम मानवाचे अगदी परिपूर्ण उदाहरण होते. माझे काही चुकले असल्यास मला माफ करा. मी नेहमीच तुमच्यावर प्रेम केले आहे आणि मी आयुष्यभर करत राहीन. तुम्ही आमच्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद पप्पा. तुमच्या आठवणी मी माझ्याबरोबर नेहमी जपत राहीन”.

आणखी वाचा – Video : निलेश साबळे सेटवर स्वतः करत आहे भाऊ कदम व ओंकार भोजनेचा मेकअप, नव्या शोसाठी मेहनत, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, जय त्याच्या वडिलांच्या जाण्याने कोलमडून गेला आहे. “या पुढे २४ जून २०२४ हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असेल. कारण मी फक्त माझे वडीलच नाही तर एक खरा मित्र, खरा पालक आणि एक खरा माणूस गमावला आहे” असं म्हणत त्याने वडिलांबद्दलच्या दु:खी भावना व्यक्त केल्या, तसेच जयच्या वडिलांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

Tags: jay dudhanemarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeeksha Tawde told the story that she did a job before entering acting field.

"मी नोकरी करत होते आणि…", 'सातव्या मुलीची…'मधील नेत्रा Mcdonald's मध्ये करत होती काम, म्हणाली, "त्या एका निर्णयामुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.