मनोरंजन विश्वातला सर्वात वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. टीव्हीवरील हाच लोकप्रिय शो आता ओटीटीवरही गाजत आहे. हा शो नुकताच सुरु झाला असून सध्या या शोची व शोमधील स्पर्धकांची चांगलीच चर्चा सुरु आहे. नुकताच या शोमध्ये एलिमिनेशन पार पडले. यामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला. नीरज गोयतला घरातून बाहेर पडण्याविषयी माहिती आधीच आली होती, पण आता त्याची हकालपट्टी दाखवण्यात आली. तर दुसरीकडे रणवीर शौरी व सना मकबूल यांच्यात भांडण झाले होते. वास्तविक, जेव्हा रणवीर व शिवानी कुमारी एकमेकांची नक्कल करून सर्वांना हसवत होते, तेव्हा अभिनेत्याचे सना मकबूलबरोबर भांडण झाले.
‘बिग बॉस’ने सर्व घरातील सदस्यांना ‘बिग बॉस’च्या राहत्या भागात बोलावले आणि सांगितले की, या सीझनच्या पहिल्या सदस्याला घरातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे. यावेळी ‘बिग बॉस’ म्हणतात की, “प्रेक्षकांचा निर्णय आला आहे, परंतु त्याला घरातील सर्व सदस्यांकडून एक एक करून जाणून घ्यायचे आहे की कोणाला बाहेर काढले पाहिजे”. यावेळी १४ पैकी ९ कुटुंबातील सदस्यांना वाटते की, शिवानीला बाहेर काढावे. पण प्रेक्षकांच्या मतांच्या जोरावर नीरज गोयतला बेदखल केले जाते. शिवानीला बाहेर काढावे असे प्रेक्षकांना वाटत नाही, असे ‘बिग बॉस’चे म्हणणे आहे. मग ‘बिग बॉस’ नीरज गोयतला घरातून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याने घराचा निरोप घेऊन बाहेर यावे असं सांगतात.
Catch the contestants pulling off a 'paw-some' task! 🐶
— JioCinema (@JioCinema) June 26, 2024
Watch #BiggBossOTT3 streaming exclusively on JioCinema Premium, tonight at 9pm.#BBOTT3onJioCinema #BBOTT3 #BiggBoss #JioCinemaPremium pic.twitter.com/RhpYnTj2C9
शोच्या सुरुवातीला, टास्क संपल्यानंतर, ‘बिग बॉस’ने उघड केले की, घरातील ज्या चार सदस्यांना सर्वात जास्त बेदखल होण्यासाठीची मते मिळाली आहेत ते सना सुलतान, साई केतन राव, रणवीर शोरे आणि दीपक चौरसिया आहेत. त्याचबरोबर नीरज घराबाहेर गेल्याने त्याच्या चाहत्यांनीही प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्याचे अनेक चाहते म्हणत आहेत की नीरजने ‘बिग बॉस’बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, त्यामुळेच त्याला शोमधून बाहेर फेकण्यात आले आहे.
आणखी वाचा – शेखरच्या हातून विरोचकाला अस्तिकट्यार मिळाली, पण देवीआईचे काही वेगळेच संकेत, मालिकेत नवा ट्विस्ट
दरम्यान, बिग बॉस ओटीटीच्या या तिसऱ्या पर्वात १६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ज्यामध्ये अरमान मलिक, पायल मलिक, कृतिका मलिक, नेझी, नीरज गोयत, शिवानी कुमारी, पौलोमी दास, सना मकबुल, सना सुलतान खान, विशाल पांडे, चंद्रिका दीक्षित, मुनिषा खटवानी, साई केतन राव, दीपक चौरसिया आणि लवकेश कटारिया यांचा समावेश आहे. मात्र, नीरजच्या एलिमिनेशनमुळे आता शोमध्ये १५ स्पर्धक उरले आहेत.