शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी नोकरी करत होते आणि…”, ‘सातव्या मुलीची…’मधील नेत्रा Mcdonald’s मध्ये करत होती काम, म्हणाली, “त्या एका निर्णयामुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 27, 2024 | 2:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi fame Titeeksha Tawde told the story that she did a job before entering acting field.

"मी नोकरी करत होते आणि…", 'सातव्या मुलीची…'मधील नेत्रा Mcdonald's मध्ये करत होती काम, म्हणाली, "त्या एका निर्णयामुळे…"

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. याच लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तितीक्षाने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. तितीक्षा तावडे ही छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. मात्र अभिनय क्षेत्रात येण्याआधी ती एका हॉटेलमध्ये काम करत होती. याबद्दल स्वत: अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील सोशल मीडिया अकाऊंटद्वारे तितीक्षाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका मोठ्या निर्णयाबद्दल सांगितलं आहे. तसेच या मोठ्या निर्णयामुळे तिच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडला असल्याचेही तितीक्षाने संगितले. या आठवणीबद्दल सांगताना तितीक्षा असं म्हणाली की, “अभिनेत्री होण्याआधी मी एके ठिकाणी काम करत होते. माझा एक खूप चांगला जॉब होता. तेवढ्यासाठी मी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. दोन ते अडीच वर्षे मी त्या जॉबवर रुजू होते. त्यानंतर खूप प्रमोशन वगैरे झालं होतं. पण मग अभिनेत्री व्हायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मला तो जॉब सोडावा लागला होता आणि यासाठी मी खूप मोठी आर्थिक जोखीम पत्करत होती”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वातील पहिला स्पर्धक घराबाहेर, सुप्रसिद्ध स्पर्धकाची आश्चर्यकारक एक्झिट

यापुढे तिने असं म्हटलं की, “ज्याबद्दल मला काहीच ज्ञान नाही त्याठिकाणी मी उडी मारत होते. पण आता मला असं वाटत आहे की, माझ्या आयुष्यातला तो सर्वात चांगला निर्णय होता. त्या एका निर्णयामुळे, त्या एका जोखीमेमुळे आणि ती एक गोष्ट सोडल्यामुळे माझा कायापालट झाला आणि माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. त्यामुळे मला आता असं वाटत आहे की, माझ्यासाठी तो अगदी योग्य व मोठा निर्णय होता”.

आणखी वाचा – Video : निलेश साबळे सेटवर स्वतः करत आहे भाऊ कदम व ओंकार भोजनेचा मेकअप, नव्या शोसाठी मेहनत, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, तितीक्षा अभिनय क्षेत्रात येण्याआधी मॅकडॉनल्ड या कंपनीमध्ये कामाला होती. या कामाचे तिला चांगले पैसेही मिळत असत. मात्र आपल्यातील अभिनयकला जोपासण्यासाठी तिने तो जॉब सोडत अभिनयाची वेगळी वाट निवडली. त्यानंतर तितीक्षाने अनेक मालिका व काही चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून नेत्राच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.           

Tags: marathi actressmarathi entertainment newstiteeksha tawde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
kaun banega crorepati season 16

KBC च्या १६व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चन दिसणार नव्या रुपात, प्रोमोने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.