सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लता मंगेशकरांसह अनेक हिंदी गायकांच्या गाण्यांवर पाकिस्तानात बंदी, देशभक्ती दाखवण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा  

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 2, 2025 | 12:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Indian songs ban in pakistan

पाकिस्तानात हिंदी गाण्यांवर बंदी, अचानक असा निर्णय का घेतला?

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळालं. २६ पर्यटकांनी या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमावला. काही कुटुंबातील आधारवडच हरपला. सरकारद्वारे पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आपला माणूस गमावल्याचं दुःख कुटुंबियांना आयुष्यभरासाठी शांत बसू न देणारं आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारद्वारे अनेक कठोर निर्णय घेण्यात आले. सर्वच स्थरातून संतापाची लाट असताना पाकिस्तानी कलाकारांबाबतही चर्चा सुरु झाली. चित्रपटसृष्टीमधील अनेक मंडळींनी दहशतवादी हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला. पाकिस्तानी कलाकारांनीही भारतात काम करावं का? हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अशात आता पाकिस्तानद्वारे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (indian songs ban in pakistan)

बॉलिवूडमधील गाण्यांचे जगभरात फॅन आहेत. पाकिस्तानातही ही गाणी आवर्जून ऐकली जातात. पण आता पाकिस्तानी रेडिओ स्टेशनवर भारतातील गाणी ऐकायला मिळणार नाहीत. रेडिओ स्टेशनने भारतीय गाण्यांचा वापर करु नये असा पाकिस्तानने आदेश दिला आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. पाकिस्तानातील सूचना मंत्री यांनी याविषयी सांगतिलं. पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोशिएशनचे प्रमुख शकील मसूद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

आणखी वाचा – “९९% काश्मिरी हे भारताशी निष्ठावान”, जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले, “पहलगाम हल्ला…”

ते म्हणाले, “या निर्णयामधून आमचं देशाप्रती प्रेम आणि आम्ही देश म्हणून संघटित आहोत हे दिसून येईल. या कठीण दिवसांमध्ये राष्ट्रीय एकता पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. भारताने पाकिस्तानी युट्युब चॅनल बॅन केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. समा टीव्ही, डॉन न्यूज सारख्या युट्यूब चॅनलला भारताने बॅन केलं आहे”. म्हणजेच आता पाकिस्तानमधील रेडिओवर भारतातील गाणी ऐकू येणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vaarso Musical Series (@vaarso.musicalseries)

आणखी वाचा – “मीसुद्धा माझी लघवी प्यायली आहे”, परेश रावलनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली, “सुंदर त्वचेसाठी आणि…”

भारताने पाकिस्तानी काही युट्यूब चॅनलवर बंदी आणली. त्यानंतर अनेकांनी या डिजिटल स्ट्राइकचं कौतुक केलं. त्याचबरोबरीने काही पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही बंदी आणली. काही पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट दिसत नसल्याचं अनेक भारतीयांच्याही निदर्शनास आलं. भारताचा हा डिजिटल स्ट्राइक देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
IIT Aspirant Wants To Runaway From Home

शिस्त की शिक्षा; IIT विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी लेकीच्या बेडरुममध्ये लावले कॅमेरे, मुलीला सहन होईना, घरातून पळून…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.