शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिस्त की शिक्षा; IIT विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी लेकीच्या बेडरुममध्ये लावले कॅमेरे, मुलीला सहन होईना, घरातून पळून…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 2, 2025 | 3:00 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
IIT Aspirant Wants To Runaway From Home

IIT विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी लेकीच्या बेडरुममध्ये लावले कॅमेरे, मुलीला सहन होईना, घरातून पळून…

IIT Aspirant Wants To Runaway From Home  : सोशल मीडियावर आयआयटीची तयारी करणाऱ्या एका विदयार्थ्याच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ती अभ्यास करीत आहे की नाही हे पाहण्यासाठी पालकांनी तिच्या खोलीत कॅमेरा लावला. मुलीने ऑनलाईन पोस्टमध्ये सांगितले की, ‘जेव्हा पालकांनी तिच्या खोलीत कॅमेरे बसवले तेव्हा तिला प्रचंड राग आला, परंतु ती काही बोलू शकली नाही. जेव्हा तिने आपली खोली बदलली, तेव्हा पालकांनी तिथेही कॅमेरा ठेवला’. शेवटी तिने असे लिहिले की, “आता मी केव्हा मोठी होतेय आणि या घरापासून पळून जातेय याची मी वाट पाहत आहे. आता मी माझ्या पालकांना सहन करु शकत नाही”.

ही पोस्ट शेअर करत पालकांचे प्रशिक्षक हरप्रीत सिंग ग्रोव्हर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, अशी अनेक मुले आहेत ज्यांचे आयआयटी क्लिअर झाले आहेत, परंतु ते वर्गात उपस्थित राहत नाहीत. आणि मग तक्रारी पालकांकडे जातात. आता पालकांना हे कधी कळणार की मुलांना अभ्यासाची इच्छा मारुन नाहीतर आतून निर्माण झाली पाहिजे. जर आपल्याला ही भावना आपल्या मुलाच्या मनावर कधीही येऊ नये असे वाटत असेल तर कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी त्याच्या आवडीबद्दल निश्चितच माहिती असावी”.

आणखी वाचा – “९९% काश्मिरी हे भारताशी निष्ठावान”, जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले, “पहलगाम हल्ला…”

View this post on Instagram

A post shared by Harpreet Singh Grover | Parenting (@thecuriousparent.harpreet)

जर आपला मुलगा कंटाळा न करता बर्‍याच दिवसांपासून एखाद्या विषयाचा अभ्यास करत असेल तर त्याला तो विषय आवडतो हा एक संकेत आहे. त्याच्याकडे याबाबत प्रश्न विचारुन त्याची आवड जाणून घेऊ शकता. जर आपल्या मुलाने त्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले किंवा त्यामध्ये काहीतरी नवीन जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली तर समजून घ्या की आपला निर्णय योग्य आहे. परंतु जर हे असे दिसत नसेल तर मुलाची आवड ओळखण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा – “मीसुद्धा माझी लघवी प्यायली आहे”, परेश रावलनंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दावा, म्हणाली, “सुंदर त्वचेसाठी आणि…”

जर मुलाने इतरांनी शिकलेल्या गोष्टी सखोलपणे स्पष्ट केल्या तर त्या विषयावर त्याला रस आहे हा एक मुद्दा आहेच. इतकेच नव्हे तर त्या विषयाबद्दल देखील पूर्ण आत्मविश्वास आहे. जो विषय पालकांना मुलांनी करावा असं वाटत आहे त्याबाबत मुलांना रुची नसेल तर तो विषय मुलांपासून दूर न्या. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांचा निर्णय मुलांवर लादू नये. सक्तीने घेतलेला विषय केवळ मुलांचा वेळ वाया घालवत नाही तर मनही वळवते. एखाद्या विषयात अडचणीनंतरही मूल त्यात कठोर परिश्रम करीत असेल तर ते त्याच्या तीव्र उत्सुकतेचे आणि उत्कटतेचे लक्षण आहे. परंतु जर हे असे दिसत नसेल तर आपण आपल्या निर्णयावर पुन्हा पुनर्विचार केला पाहिजे.

Tags: IIT Aspirant Wants To Runaway From Homeiit studentiit student home behaviour
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
nikki tamboli admitted in hospital

श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसांचा आजार अन्...; ICUमध्ये होती निक्की तांबोळी, मृत्यू जवळून पाहिला आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.