२०२० मध्ये आलेली ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज खूप लोकप्रिय ठरली होती. अभिनेता जयदीप अहलावतची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या सीरिजनंतर अनेक चाहत्यांनी या सीरिजचा दूसरा भाग यावा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. ‘पाताल लोक’ या लोकप्रिय वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याबद्दल सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत माहिती देण्यात आली आहे. (paatal lok season 2)
प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या सीरिजच्या आगामी भागाबद्दल अपडेट देण्यात आली आहे. सोशल मीडियावर पाताल लोक या सीरिजच्या दुसऱ्या भागाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे आणि या पोस्टरवर जयदीप अहलावतचा चेहरा दाखवण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये जयदीप अहलावतच्या डोळ्याजवळ धारदार चाकू ठेवलेला असून त्यावर रक्ताचे डाग आहेत. एकूणच या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन अजूनही जिवंत?, कुटुंबियांकडून मोठी माहिती, म्हणाले, “उपचार सुरु आहेत आणि…”
या वेब सीरिजच्या घोषणेच्या पोस्टमध्ये, “हातोड्याचा वापर करून इंटरनेट ब्रेक करणार आहोत, पाताल लोकचा नवा सीझन लवकरच येणार आहे” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या पोस्टरवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत उत्सुकता व्यक्त केली आहे. “अरे भाईसाब, काय बातमी घेऊन आलात!”, “आता मजा येईल, हथोडा त्यागी परत आला”, “हथोडा त्यागी इज बॅक”, “किती वाट पाहायला लावली, आता थेट तारीख सांगा” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या सीरिजबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमधील कलाकार अजून गुप्त ठेवण्यात आली आहे. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत (इन्स्पेक्टर हातीराम चौधरी) आणि इश्वाक सिंग (कॉन्स्टेबल अन्सारी) यांच्या भूमिका होत्या. ‘झीझेस्ट’च्या अहवालानुसार, दुसऱ्या सीझनसाठी जहानू बरुआ, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर, गुल पनाग आणि अनुराग अरोरा हे कलाकार असणार आहेत.