रविवारी रात्री प्रसिद्ध तबला वादक यांच्या निधनाचे वृत्त आले अआणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली असे अनेक वृत्तांमधून समोर आले. मात्र आता त्यांच्याच कुटुंबियांनी एक मोठी अपडेट दिली आहे, ती म्हणजे तबला वादक जीवंत आहेत. नवभारतच्या वृत्तानुसार प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन अजूनही जिवंत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. (Zakir Hussain is still alive)
हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यामुळे त्यांना सॅन फ्रान्सिस्कोच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. बहीण खुर्शीद यांनी झाकीर हुसैन यांच्या प्रकृतीबद्दल सांगताना त्यांचा श्वासोच्छवास सुरु असल्याचे म्हटलं आहे. खुर्शीद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “माझा भाऊ सध्या खूप आजारी आहे. आम्ही भारतातील आणि जगभरातील त्याच्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यास सांगत आहोत”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन, परदेशात सुरु होते उपचार, चित्रपटसृष्टीवर शोककळा
झाकीर यांच्या बहिणीने पुढे म्हटले की, “मी सर्व माध्यमांना विनंती करू इच्छिते की, त्यांच्या निधनाबद्दल चुकीच्या माहितीकडे लक्ष देऊ नका. ते जीवंत आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असली तरी ते अजूनही आपल्याबरोबर आहेत. ते अजून गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे लिहून किंवा सांगून अफवा पसरवू नका, अशी मी त्यांना विनंती करते. फेसबुकवरील बातम्या पाहून मला खूप वाईट वाटते, जे अत्यंत चुकीचे आहे”.
आणखी वाचा – 16 December Horoscope : मेष, सिंह व क्रर्क राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस आर्थिक लाभचा, जाणून घ्या…
तसंच झाकीरच्या प्रचारकाने पीटीआयला सांगितले की, ते अजूनही सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात दाखल आहे. त्यांचे निधन झालेले नाही. हृदयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना उच्च रक्तदाबाची समस्या होती. त्याचबरोबर झाकीरचा पुतण्या आमिर औलियानेही एका पोस्टमध्ये लिहिले की, “माझे काका झाकीर हुसैन अजूनही जिवंत आहेत”