रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शोभिता धुलिपालाचा नागा चैतन्यच्या पायाला स्पर्श करत नमस्कार, अभिनेत्रीची कृती पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “नाटक…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 16, 2024 | 11:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
South Actress Sobhita Dhulipala touched her husband Naga Chaitanya feet video viral on social media netizens criticized

शोभिता धुलिपालाने नवरा नागा चैतन्यच्या पायाला स्पर्श करत केला नमस्कार, नेटकऱ्यांनी नाटक म्हणत केली टीका

नागार्जुन यांचा थोरला लेक म्हणजेच अभिनेता नागा चैतन्य याने ४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. अभिनेत्याने लोकप्रिय अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले असून, हे त्याचे दुसरे लग्न होते. त्यांच्या लग्नाचे अबेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. तसंच या दोघांच्या फोटोला नेटकऱ्यांकडुनही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओमुळे नागा चैतन्य व त्याची बायको शोभिता टीकेचे धनी झाले आहेत. नागा चैतन्यकडून आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Sobhita Dhulipala touched Naga Chaitanya feet)

तामिळ विवाहांमध्ये, आदर आणि प्रेमाचे चिन्ह म्हणून वधूने आपल्या पतीच्या पायांना स्पर्श करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा म्हणून शोभिताने आशीर्वाद घेण्यासाठी पती नागाच्या पायांना स्पर्श केला. नुकताच नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यात शोभिता आणि नागा चैतन्य एकमेकांसोबत बसलेले दिसत होते. यावेळी तिने नागा चैतन्यच्या पायांना स्पर्श केला. मात्र यामुळे नेटकऱ्यांनी दोघांवर टीका केली आहे.

View this post on Instagram

A post shared by kollywood cinema news (@kollywood_cinema_news)

आणखी वाचा – झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार, भावुक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख

टीका करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे एक मजेदार नाटक आहे. महिला, स्त्रीवाद आणि त्या सर्वांबद्दल बोला आणि त्यांच्या पायांना स्पर्श करा”. एकाने लिहिले की, “आपण २०२४ मध्ये राहत आहोत?” तर एकाने म्हटलं आहे की, “तो तिला थांबवत नाहीय, त्याऐवजी त्याला वाटत आहे की, तो काही देव आहे आणि त्यामुळे तो तिला आशीर्वाद देत असल्यासारखे वागत आहे”. तसंच काहींनी असा युक्तिवाद केला की, “हा केवळ एक विधी आहे, पण त्याचा असा न्याय केला जाऊ नये”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन अजूनही जिवंत?, कुटुंबियांकडून मोठी माहिती, म्हणाले, “उपचार सुरु आहेत आणि…”

दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते.  त्यानंतर आता शोभिताबरोबर दुसरे लग्न करत त्याने त्याच्या दुसऱ्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.

Tags: naga chaitanya sobhita dhulipala togethersobhita dhulipalaSobhita Dhulipala touched Naga Chaitanya feet
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Allu Arjun  Statement

तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुनने जखमी मुलाची भेट न घेतल्याने नेटकऱ्यांकडून ट्रोल, अभिनेता म्हणाला, "कायदेशीर कारवाईमुळे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.