छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी’चा १८वा सीझन सुरु झाला आहे. प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळी देखील ‘बिग बॉस’च्या घरात उपस्थित स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा करत आहेत. या शोमध्ये स्पर्धक म्हणून असलेली बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरनेही तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. यावेळी अभिनेत्रीने उघड केले की, तिने २००८ मध्ये तिचे पालक गमावले, त्यानंतर ती नैराश्यात गेली. ८ ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये सहकारी स्पर्धक गुणरत्न सदावर्ते यांच्याशी भावनिक संवाद साधताना शिल्पा तिच्या संघर्षाची आठवण काढून रडताना दिसली. (Shilpa Shirodkar Bigg Boss 18)
त्या कठीण काळात तिचा पती अपरेश रणजीत हा तिचा ताकदीचा आधारस्तंभ बनल्याचे तिने उघड केले. शिल्पा म्हणाली, “जेव्हा २००८ मध्ये माझ्या आई-वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले होते. अपरेश त्याच्या करिअरमध्ये खूप चांगले काम करत होता, परंतु त्याने सर्व काही सोडले आणि आम्ही भारतात आलो”. यादरम्यान शिल्पा खूप भावूक झाली आणि म्हणाली की, “जर अपरेशने त्याग केला असता आणि त्याने हार मानली नसती तर बँकिंग उद्योगातील त्यांची कारकीर्द अधिक उंचीवर पोहोचू शकली असती”.
आणखी वाचा – “कोणी काय खायचं?, घरात काय बनवायचं?”, हे फक्त जया बच्चनच ठरवतात, अमिताभ यांनी सांगितलं घरात नक्की काय घडतं?
यादरम्यान गुणरत्न यांनी शिल्पाच्या अभिनय प्रवासाचे कौतुक केले आणि तिच्या क्षमतेची माधुरी दीक्षित सारख्या आयकॉनशी तुलना केली. तो म्हणाला, “माधुरीच्या समान पातळीवर पोहोचू शकणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींपैकी तू एक होतीस. पण अचानक तू इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतलास”. यावर शिल्पा म्हणाली, “पण ही नशिबाची गोष्ट आहे आणि मला कशाचाही पश्चाताप होत नाही”.
आणखी वाचा – “निक्कीमुळेच माझी दुसरी बाजू समोर आली”, अरबाज पटेलचं वक्तव्य, आकंठ प्रेमात, म्हणाला, “माझ्या भावना…”
शिल्पाने ‘सिलसिला प्यार का’ आणि ‘सावित्री देवी कॉलेज’ आणि ‘हॉस्पिटल’सह अनेक चित्रपट व टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. तिने पुन्हा एकदा ‘बिग बॉस १८’ मधून टीव्हीवर पुनरागमन केले आहे. दरम्यान, तिची बहीण नम्रता शिरोडकर आणि मेव्हणा महेश बाबू यांनी या शोमध्ये सहभागी होण्याच्या अभिनेत्रीच्या निर्णयाबद्दल आनंद व अभिमान व्यक्त केला आहे.