बॉलिवूड अभिनेत्री पुनम ढिल्लन या ७०-८० व्या दशकातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रात कार्यरत नसल्या तरीही सोशल मीडियावर त्या अधिक सक्रिय असतात. मात्र आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या मुंबईतील खार येथील घरामध्ये लाखो रुपयांची चोरी झाली आहे. ही चोरी त्यांच्या घरी रंगकाम करणाऱ्या एका कामगाराने केली आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने ही चोरी केली असल्याचे समोर आले आहे. याबाबत आता पोलिसांनी समीर अंसारीला ताब्यात घेतले आहे. नक्की प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊया. (poonam dhillon robbed)
मिळालेल्या माहितीनुसार, खार पोलिसांनी पुनम यांच्या खार येथील घरात एक लाख रुपयांचे कानातले, ३५ हजार रुपये रोकड व ५०० अमेरिकन डॉलर चोरी करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी ३७ वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान समोर आले की समीर अंसारीने २८ डिसेंबर ते ५ जानेवारी या दरम्यान पुनम यांच्या घरी काम करत होता. यावेळी काम करत असताना त्याला कपाट उघडं दिसलं. या कपाटांमध्ये त्या किंमती समान ठेवत असत. दरम्यान या आरोपीने या चोरी केलेल्या पैशांमधून नऊ हजार रुपयांची पार्टीदेखील केली होती.
पुनम यांचा मुलगा अनमोल हा ५ जानेवारी रोजी दुबईमधून परत आला. त्याने कपाट तपासलं तेव्हा समान गायब असल्याचे समजलं. याबद्दल माहिती देण्यासाठी मुलाने पूनम यांना फोन केला. घरात काम करणाऱ्या बाईशी बोलणं केल्यानंतर अभिनेत्रीचे मॅनेजर संदेश चौधरी यांनी खार पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल केल्यानंतर सगळ्या पेंटर्सना चौकशीसाठी पोलिस स्थानकात बोलावले. यावेळी समीर अंसारीणए त्याचा गुन्हा कबूल केला आणि त्याला अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आरोपीला शिक्षा काय झाली आहे? हे अद्याप समजू शकले नाही.