शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, केवडाप्रती असलेलं प्रेम पाहवेना, नात्याला कोणतं नवं वळण मिळणार?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 8, 2025 | 3:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
itsmajja series 2nd episode update reshma is upset because of abhya see the details

आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, ‘दहावी-अ’च्या पुढील भागात काय पाहायला मिळणार? जाणून घ्या...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांवर एका सीरिजची चर्चा होताना पाहायला मिळाली आणि ही सीरिज आहे ‘इट्स मज्जा’ची ‘दहावी-अ’ ही सीरिज. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर ही सीरिज ६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शाळेतील दहावीच्या वर्षात घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या एका नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून पाहता येणार आहे. या सीरिजचा नुकताच पहिला भाग (सोमवार ०६ जानेवारी) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. (Dahavi-A Series 2nd episode update)

या पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. पुढे शाळेत आलेल्या नवीन इंग्रजीच्या शिक्षिकेबद्दल हे मित्र संवाद साधतात. त्यानंतर आभ्या आईकडे सायकलची मागणी करतो. मात्र त्याची आई त्याला कामात मदत करण्यावरुन बोलते. त्यानंतर त्याची आई त्याला गावात कोणती तरी जुनी सायकल असल्यास बघ असं म्हणते. रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला त्यांच्या लग्नाविषयी सांगतात. रेश्मा व पल्लवीची आई रेश्माला दहावी होताच रेश्माचं लग्न लावणार असल्याचे म्हणतात. यामुळे रेश्मा काहीशी नाराज होते. त्यानंतर विक्या त्याच्या वडिलांकडे पैसे मागतो.

 

आणखी वाचा – लग्न करुन आई होण्याचं अनन्या पांडेचं स्वप्न, लवकरच थाटणार संसार, म्हणाली, “लग्न करुन मला…”

पुढे शाळेत पोहोचताच रेश्मा आभ्याकडे त्याची इंग्रजीची वही मागते आणि आभ्याही तिला वही देतो. तेवढ्यात त्याला कळतं की, केवडाला सुद्धा त्याच्या वहीची गरज आहे. त्यामुळे तो रेश्माला तिचं वहीचं काम झाल्यानंतर ती वही केवडाला देण्यास सांगतो. त्यानंतर रेश्मा आभ्याची वही केवडाला देते. पुढे सागऱ्या आभ्या व त्याच्या मित्रांना दहावी अ या वर्गात आल्यावरुन चिडवतो. यादरम्यान त्यांची एकमेकांबरोबर नौकझोक होते. यावेळी मध्या सागऱ्याचा चांगलाच अपमानही करतो.

आणखी वाचा – अधिपती-अक्षरामध्ये पुन्हा एकदा दुरावा आणण्यासाठी भुवनेश्वरी यशस्वी, दोघांचा संसार मोडण्यासाठी प्रयत्न, मोठा ट्विस्ट

त्यामुळे आता सागऱ्या त्याच्या या अपमानाचा बदला कसा घेणार? पुन्हा आभ्या, मध्या, किरण्या व विक्या यांच्यात आणि  सागऱ्यामध्ये वाद होणार का? तसंच दुखावलेल्या रेश्माचे मन आभ्या समजू शकेल का? आणि केवडा व आभ्या यांच्या नात्यात आणखी काय नवीन वळण येणार? हे आगामी भागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याचबरोबर आभ्या, विक्या, किरण्या, मध्या, रेश्मा व केवडा यांच्या आयुष्यात या ‘दहावी-अ’ या वर्षात काय नवीन बदल होणार? हेही लवकरच पाहायला मिळेल.   

Tags: Dahavi-A Series 2nd episode updateItsmajja Dahavi-A SeriesItsmajja Original Dahavi-A Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
poonam dhillon robbed

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी लाखो रुपयांची चोरी, घरी रंगकाम करणाऱ्यानेच लंपास केले दागिने व पैसे, आरोपी अटकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.