शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रतिक्षा संपली! ‘पाऊस’ वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद, तुम्ही पाहिलात का?   

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 19, 2024 | 2:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
itsmajja original paus series first episode out now

इट्स मज्जा ओरिजिनलच्या ‘पाऊस’ या नवीन सीरिजचा पाहिला भाग प्रदर्शित, कशी आहे आहे सीरिज? इथे पाहा

Paus Series : ‘पाऊस’ हा कायमच प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पावसाबरोबरच्या अनेकांच्या आठवणी या अविस्मरणीय असतात आणि या आठवणी बेभान करणार्‍या असतात. पाऊस आणि प्रेम याबद्दल आता व्यक्त होण्याचे कारण म्हणजे ‘इट्स मज्जा’ची आगामी सीरिज ‘पाऊस’. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ व ‘इट्स मज्जा’ हे कायमच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘इट्स मज्जा’ने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली आहे आणि त्यामुळेच ‘इट्स मज्जा’ कायमच मनोरंजक कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. अशातच ‘इट्स मज्जा’ ‘पाऊस’ या नवीन सीरिजमधून एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येत आहे. (Paus Series first Episode)

पाऊस आणि प्रेमाचं नात हे प्रत्येकाला भावणारं आहे. प्रत्येकाच्या प्रेमकहाणीमध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस हा महत्वाचा असतो. याच पाऊसाचं आणि प्रेमाचं एक अल्लड नातं उलगडणारी ‘पाऊस’ ही नवीन वेबसीरिज आपल्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि या ट्रेलरमधून पाऊस, प्रेम व प्रेम करणारी दोन माणसं पाहायला मिळाली. त्यामुळे प्रेक्षकांना या सीरिजविषयी व या सीरिजच्या कथानकाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. अशातच आता या सीरिजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ये शेंबडी, चल हट”, निक्की-जान्हवीची घरात पुन्हा दादागिरी, दोघींचा तोच अवतार पाहून प्रेक्षक म्हणाले, “यांचा माज…”

‘पाऊस’ या सीरिजमध्ये मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा अभिनेत्री आरती बिराजदार ही मुख्य भूमिकेत असून तिच्याबरोबर अक्षय खैरे हादेखील मुख्य भूमिकेत आहे.  ‘सुंदरी’ मालिकेत आरती ही कलेक्टरच्या भूमिकेत होती. त्यामुळे एक सुशिक्षित, जबाबदार, आपल्या कुटुंबासाठी जगणारी आणि सर्वांना सांभाळून घेणारी अशी तिची भूमिका होती. या मालिकेनंतर आरती आता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पाऊस’ ही सीरिज आरती व अक्षय या मुख्य दोन भूमिकांबद्दल असली तरी या सीरिजमध्ये इतर अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. 

आणखी वाचा – “रडतात सगळेच दिसले फक्त मीच”, Bigg Boss Marathi मधून बाहेर आल्यानंतर योगिता चव्हाणचे खुलासे, म्हणाली, “आतमध्ये खूप काही घडत असतं पण…”

दरम्यान, ‘पाऊस’ची कथा व दिग्दर्शन हे ‘आठवी-अ’च्या नितीन पवार यांनी केलं आहे. तसंच या सीरिजच्या निर्मितीची जबाबदारी शौरीन दत्ता यांनी स्वीकारली आहे. तर या सीरिजच्या क्रिएटीव्ह व प्रोजेक्ट हेड अंकिता लोखंडे आहेत. प्रेम, पाऊस आणि या दोघांमधला गोडवा व दुरावा या सीरिजमधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि हा अनुभव म्हणजेच ‘पाऊस’ ही सीरिज आज १९ ऑगस्टपासून दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’ या युट्यूब वाहिनीवर पाहता येणार आहे.

Tags: Itsmajja Original Paus SeriesItsmajja Original Paus Series NewsMarathi Series News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
sandeep khare special post

संदीप खरेच्या लेकीची मुख्य भूमिकेतील पहिलीच मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाले, "चिल बाबा म्हणते आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.